[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs PAK Babar Azam Record : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज होणार आहे. पाकिस्तानने आशिया चषकात दमदार कामगिरी केली आहे. सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सात विकेटने विजय मिळवला. मागील दोन वर्षांत बाबर आझम याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात कर्णधार बाबर आझम याने दीडशतकी खेळी करत भारताच्या गोलंदाजांना एकप्रकारे सावध राहण्याचा इशाराच दिला. जगातील अव्वल क्रमांकाच फलंदाज असलेल्या बाबरची भारताविरोधात निराशाजनक कामगिरी आहे. भारताविरोधात वनडेमध्ये मागील सहा वर्षांपासून बाबरला अर्धशतकही झळकावता आले नाही.
पाकिस्तानच्या फलंदाजीचा स्तंभ मानला जाणाऱ्या बाबरला भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात दिमाखदार कामगिरी करता आली नाही. वनडेमध्ये भारताविरोधात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. 2017 मध्ये बाबरने भारताविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आजतागत त्याला एकाही अर्धशतक ठोकता आले नाही. धावांचा हा दुष्काळ आशिया चषकात दूर करणार का ? असा सवाल पाकिस्तानच्या चाहत्यांना सतावतोय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षानंतर एकदिवसीय सामना होत आहे. गेल्यावेळीस हे दोन संघ 2019 च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात बाबर आझम याने 48 धावांची खेळी केली होती. ही त्याची भारताविरोधातील सर्वोत्तम खेळी आहे. आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारताविरोधात बाबर प्रभावहीन
बाबर आझम याने पाकिस्तानसाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 103 वनडे डावात बाबरने 59 च्या सरासरीने 5370 धावा केल्या आहेत. पण भारताविरोधात त्याला अर्धशतकही ठोकता आलेले नाही. भारताच्या गोलंदाजीसमोर बाबर संघर्ष करताना पाहायला मिळतो. भारताविरोधात पाच एकदिवसीय सामन्यात बाबर आझम याला 31.60 च्या सरासरीने फक्त 158 धावा करता आल्यात.
भारताविरोधात वनडेमध्ये बाबरची कामगिरी कशी राहिली ?
2017 चॅम्पियन ट्रॉफी- 8 धावा
2017 चॅम्पियन ट्रॉफी- 46 धावा
2018 आशिया कप- 47 धावा
2018 आशिया कप- 9 धावा
2019 वर्ल्ड कप- 48 धावा
भारत-पाकिस्तानचा आज थरार –
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. आता कोलंबो येथे होणारी लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आज पावसामुळे सामना झाला नाही तर सोमवारी तेथूनच पुढे सामन्याला सुरुवात होईल.
[ad_2]