[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asia Cup 2023 : कोलंबोत भारताविरोधात होणाऱ्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान संघाने एकदिवस आधीच प्लेईंग 11 ची घोषणा केली. पाकिस्तानच्या संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. पाकिस्तानच्या संघात फक्त एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाचा समावेश आहे. याच कमकुवत बाजूचा भारतीय संघ फायदा घेऊ शकतो. शादाब खान या एकमेव फिरकी गोलंदाजाला पाकिस्तान संघात स्थान मिळाले आहे. त्याच्या जोडीला दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज आहेत, याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो.
पाकिस्तान संघात शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या वेगवान तिकडीच्या जोडीला आता फहीम अशरफ याला स्थान दिलेय. पाकिस्तान संघाकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून फक्त शादाब खान आहे. त्यामुळे पाकिस्तानची फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसतेय. शादाब खानही फॉर्मात नाही. शादान खान याने मागील 12 वनडे सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. त्यामध्ये नेपाळसारख्या नवख्या संघाविरोधातील चार विकेटचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघ या कमवुकत बाजूचा फायदा घेऊ शकतो.
शादाब खान याच्याजोडीला दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज संघात आहेत. अष्टपैलू सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद फिरकी गोलंदाजी करु शकतात. पण या दोघांकडे गोलंदाजीचा तितकासा अनुभव नाही. सलमान आगामा याने 17 वनडे सामन्यात फक्त चार विकेट घेतल्या आहेत. तर इफ्तिखार अहमद याने 17 वनडे सामन्यात नऊ विकेट घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाजीतील कमजोर बाजूचा भारतीय संघ फायदा घेऊ शकतात. साखळी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांची कुटाई केली होती. साखळी फेरीत पाकिस्तानच्या वेगवान तिकडीने भारताच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवले होते. आज होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारतेय? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
फिरकीविरोधात भारतीय फलंदाज दमदार फॉर्मात
भारतीय फलंदाज नेहमीच फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतात. फिरकी गोलंदाजाविरोधात टीम इंडियाच्या फलंदाजाची कामगिरी दमदार राहिली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या सर्वांची फिरकीविरोधात दमदार कामगिरी आहे. वेगवान माऱ्याच्या तुलतेन हे फलंदाज फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतात. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा हे विस्फोटक फलंदाजही फिरकीला टार्गेट करतात. अशा स्थितीत भारतीय संघ पाकिस्तानच्या कमकुवत बाजूचा नक्कीच फायदा घेतील.
पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.
[ad_2]