Coronavirus Latest Bulletin Covid 19 Total Case In India Corona Virus New Variant Jn 1

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Corona Virus Update : कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटन स्थळावर गर्दी वाढली आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केलेय. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आज 116 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. तिन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. मागील 24 तासांत 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4170 इतकी झाली आहे.  

केरळमध्ये एकही नवा रुग्ण नाही…

केरळमध्ये मंगळवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही तर 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येथील सक्रीय रुग्णांची संख्या 3096 इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 इतकी झाली आहे. तामिळनाडूमध्ये 139, कर्नाटकमध्ये 436 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्ण केरळमध्ये आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी देशात कोरोनाच्या जेएन.1 या सब व्हेरियंटचे 116 नवे रुग्ण आढळले आहेत. 

लसीची गरज नाही – 

2022 जानेवारीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहे. सध्या आलेल्या जेएन1 या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलेय.  

‘या’ राज्यात  JN.1 चे सर्वाधिक रुग्ण
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,  गोव्यात JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत गोव्यामध्ये  JN.1 चे 34 नवे रुग्ण सापडलेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 10  कर्नाटकात आठ, केरळमध्ये सहा, तामिळनाडूमध्ये चार आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा
गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.

JN.1 व्हेरिएंट काय आहे?

JN.1 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आढळून आला. हा ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2.86 ने तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला  BA.2.86 व्हेरिएंट कोरोनाबाधितांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरला होता.  BA.2.86 व्यापकपणे फैलावला नव्हता. मात्र, तज्ज्ञांनी या व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली होती.  BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनवर अतिरिक्त म्युटेशन झाले होते. त्याच प्रकारे JN.1 स्पाइक प्रोटीनवरही एक अतिरिक्त म्युटेशन आहे. 

[ad_2]

Related posts