[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
New Parliament Inauguration : नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (25 मे) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ 75 रुपयांचं नाणं (Rs 75 Coin) जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली.
75 रुपयांचं नवीन नाणं कसं असेल?
अधिसूचनेनुसार, 75 रुपयांचे नाणं गोल आकाराचं असेल आणि त्याचा व्यास 44 मिमी असेल. 75 रुपयांचं हे नाणं चार धातूंच्या मिश्रणातून बनलेलं असेल, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक वापरलं जाणार आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे.
नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र कोरलेलं असेल आणि त्याखाली 2023 हे वर्ष लिहिलं जाईल. संसद भवनच्या वरच्या
बाजूला हिंदीत ‘संसद संकुल’ आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये ‘Parliament Complex’ लिहिलेलं असेल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन गदारोळ
दरम्यान संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले असून त्यावर आज (२६ मे) सुनावणी होणार आहे.
Reels
तसे, 25 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सरकारचं निमंत्रण स्वीकारलं आहे. तर 21 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार?
NDA च्या 18 सदस्य राजकीय पक्षांव्यतिरिक्त, NDA मध्ये नसलेल्या सात पक्षांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असून ते सहभागी होणार आहेत. बसपा, शिरोमणी अकाली दल, जेडीएस, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), वायएसआर काँग्रेस, बीजेडी आणि टीडीपी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दर्शवली आहे.
संबंधित बातमी
New Parliament Building Inauguration: नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकेवर आज सुनावणी
[ad_2]