Shanti Swarup Bhatnagar Award Marathi News Important Contribution In Making The Country Self Reliant Of Science And Technology Was Dr Shanti Swaroop Bhatnagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shanti Swarup Bhatnagar Award : आज भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यात अनेक शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला केवळ स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहिलेच नाही तर ते प्रत्यक्षातही आणले. डॉ.शांती स्वरूप भटनागर (Dr Shanti Swarup Bhatnagar) यांनी देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. होमी जहांगीर भाभा, प्रशांत चंद्र महालनोबिस, विक्रम अंबालाल साराभाई यांसारख्या महान शास्त्रज्ञांसोबत त्यांनी काम केले.

देशातील 12 तरुण शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची (Shanti Swarup Bhatnagar Award) घोषणा झाली आहे. देशातील 12 तरुण शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) वर्ष 2022 साठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार दरवर्षी 45 वर्षांखालील शास्त्रज्ञांना दिला जातो. यामध्ये पाच लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.   

कोण होते डॉ.शांती स्वरूप भटनागर?

डॉ. भटनागर हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) संस्थापक संचालक होते, जी स्वतंत्र भारतातील संशोधनासाठी प्रमुख संस्था बनली. त्यांच्या निधनानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ‘मी नेहमीच अनेक प्रमुख व्यक्तींशी जोडला गेलो, जे विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध होते, परंतु डॉ. भटनागर यांना अनेक गोष्टींचे एकत्रीकरण होते. एखादी गोष्टी साध्य करण्यासाठी त्याच्याकडे प्रचंड उत्साह आणि ऊर्जा होती. दरम्यान त्यांनी एक विक्रम रचला जो खरोखर उल्लेखनीय आहे. डॉ. भटनागर शिवाय राष्ट्रीय प्रयोगशाळांची साखळी दिसली नसती. आज जर देश कोविड सारख्या महामारीशी लढू शकला असेल तर त्यामध्ये या प्रयोगशाळांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

 

मॅग्नेटो केमिस्ट्रीपासून मिळाली प्रसिद्धी
डॉ. भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 रोजी पंजाबमधील (आता पाकिस्तानमध्ये) शाहपूर जिल्ह्यातील भेरा येथे झाला. त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर, ते संशोधन फेलोशिपवर इंग्लंडला गेले, जिथे त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून डॉक्टरेटची पदवी मिळवली. त्यांनी अनेक वैज्ञानिक संशोधने केली. मॅग्नेटो केमिस्ट्री आणि इमल्शनचे फिजिकल केमिस्ट्री या क्षेत्रातील त्यांचे संशोधन सर्वत्र प्रसिद्ध झाले.

12 राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना
स्वातंत्र्यानंतर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत सुविधा तसेच धोरणे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात 12 राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याचे श्रेय त्यांना आहे. सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) पहिले अध्यक्ष होते. नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NRDC) च्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 जानेवारी 1955 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ, 1957 मध्ये, CSIR ने शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर केला, जो विज्ञानाच्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

संबंधित बातम्या

Shanti Swarup Bhatnagar Award : शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा, देशातील 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव

[ad_2]

Related posts