( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे ४ लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. </p>
Barsu Refinery Project : बारसु प्रकल्पाच्या कामाला वेग येणार, मोदी आणि बिन सलमान यांच्यात चर्चा
