India VS Pakistan : भारतावर पाकिस्तानवर 288 धावांनी मात, नागपुरासह देशभरात जल्लोष

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रोहित शर्माच्या भारतीय संघानं आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी धुव्वा उडवला. कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी ५० षटकांत ३५७ धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला ३२ षटकांत आठ बाद १२८ धावांचीच मजल मारता आली. हॅरिस रौफ आणि नसीम शाह हे दोघे दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजीला उतरले नाहीत. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं पाच विकेट्स घेऊन भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याआधी भारतानं ५० षटकांत दोन बाद ३५६ धावांची मजल मारली होती. भारताकडून विराट कोहली आणि लोकेश राहुल या दोघांनीही शतकं झळकावली. विराट कोहलीनं ९४ चेंडूंत नाबाद १२२ धावांची खेळी उभारली. तर लोकेश राहुलनं १०६ चेंडूंत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची अभेद्य भागीदारी रचली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts