VIDEO : ‘ये कोई मॅच खेलने का तरिका है?’ Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

#AsiaCup2023 : किंग कोहली (Virat Kohli) आणि धडाकेबाज के एल राहुल  (KL Rahul) यांच्या दमदार खेळीसोबत कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बॉलिंगसमोर पाकिस्तानची टीम पार कोलमडली. दोन दिवस पावसामुळे चालेल्या मॅचमध्ये भारतीय संघाच्या खेळांच्या खेळीपुढे पाकिस्तानचा तुर्ता धुव्वा उडाला. पाकिस्तानमध्येच जाऊन भारताने आमचे तुमचे बाप हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्यानंतर पाक चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. 

टीम भारतने पाकिस्तान समोर  356 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पण भारतीय गोलदांजासमोर पाकचे खेळाडू फक्त 128 धावा करुन लाजीरवाणा पराभव स्विकारात मैदानातून बाहेर पडले. भारताच्या या दमदार आणि धमाकेदार विजयानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ सुरु आहे. (Asia Cup 2023 PAK vs IND pakistani fans in tears after india victory video viral on Internet)

अशातच भारत पाकिस्तान मॅच दरम्यानचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतं आहेत. या इंटरनेटवर एका ब्लॉगरने पाकिस्तान भारत मॅच झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्याला सामन्याबद्दल प्रतिक्रिया विचारली. चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

चाहत्याला मॅचबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की,”बरं झालं की पाऊस आला, जर पाऊस नसता आला तर भारतीय संघाने आज कन्फर्म 500 रन काढले असते. यार ही कुठली मॅच खेळण्याची पद्धत आहे. ” यानंतर त्या चाहत्याला अश्रू अनावर झाले. 

चाहत्याचे अश्रू पाहून व्लॉगरने ओ भाई रो मत असं म्हणत त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ ट्वीटर म्हणजे X वर @Trolling_isart या अकाऊंटवर शेअर केला आहे. 

त्यानंतर या व्हिडीओ तुफान प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान मोमीन साकिबने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अंथरुणावर पडलेला दिसत आहे. 

या व्हिडीओवरही भन्नाट कंमेट्स येतं आहे. “मोमीन भाई, कोहली आणि केएल राहुल यावेळी खरोखरच चांगली कामगिरी करत आहेत.” त्यावर मोमीनने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुमचं शब्द ऐकून वेदना आणि ताप तितकासा कमी झालेला नाही. माझी इच्छा आहे की मी माझ्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये गेलो असतो. पण मला बरं वाटत नाही,” आणि तो अंथरुणावर पडून रडू लागला.

 

Related posts