[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Additional 10% GST Proposal on Diesel Vehicles: डिझेल वाहनांची (Diesel Vehicles) निर्मिती कंपन्यांनी कमी करावी, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी (GST) लावण्यात येईल, असा इशारा नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) दिल्याचं वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होत होतं. पण आता स्वतः नितीन गडकरींनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नसल्याचं म्हणत नितीन गडकरींनी ते वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही पडल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतीय शेअर बाजारतील ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, आयशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
नितीन गडकरींचं ‘ते’ वक्तव्य काय?
दिल्लीत पार पडत असलेल्या 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं एक वक्तव्य सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आलं होतं. जर ऑटोमोबाईल कंपन्यांनी स्वतःहून डिझेल इंजिनचा वापर कमी केला नाही, तर डिझेल इंजिनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची शिफारस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रत्यक्ष भेटत आणि पत्र लिहित करणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिल्याचं बोललं जात होतं. तसेच, अतिरिक्त जीएसटी प्रदूषण कराच्या स्वरुपात लावला जाणार असून सोबतच डिझेल वाहनांचं उत्पादन कमी करण्याची उद्योगांना विनंती, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा इशाराही गडकरींनी यावेळी दिल्याचं बोललं जात होतं. परंतु, आपल्या याच व्हायरल होणाऱ्या वक्तव्यावर आता नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
There is an urgent need to clarify media reports suggesting an additional 10% GST on the sale of diesel vehicles. It is essential to clarify that there is no such proposal currently under active consideration by the government. In line with our commitments to achieve Carbon Net…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 12, 2023
नितीन गडकरींचं स्पष्टीकरण काय?
रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “डिझेल वाहनांवरील विक्रीवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची रिफारस केल्याच्या मीडिया रिपोर्टवर तातडीनं स्पष्टीकरणाची गरज आहे. सरकारकडून सद्यस्थितीत असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. 2070 पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी, तसेच ऑटोमोबाईल विक्रीतील झपाट्यानं वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि ग्रीन पर्यायी इंधन सक्रियपणे स्वीकारणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच घातक प्रदूषण कमी करणं आणि त्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसेच, ही इंधनं स्वस्त, आणि पर्यावरणपूरक असणं आवश्यक आहे.”
दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी केलेलं डिझेल इंजिनावर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचं वक्तव्य समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालं. समाज माध्यमांमध्ये या वक्तव्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण समोर आलं. त्यांनी ट्वीट करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. पण नितीन गडकरींचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाले होते. भारतीय शेअर बाजारतील ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, आयशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI
[ad_2]