Ganpati 2023 : लालबागच्या राजाचा 26.5 कोटी रुपयांचा विमा( प्रगत भारत । pragatbharat.com)

लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडळ आहे. राजकारण्यांसह सेलिब्रिटीही येथे येतात. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे होते. लालबागचा राजा गणेश मंडळाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता लालबागचा राजा गणेश मंडळाने २६.५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे.

अनुचित प्रकार घडल्यास 5 लाख रुपयांची भरपाई

लालबागच्या राजाची गणपती म्हणून ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गणपती भक्त, मंडळाचे विश्वस्त, नोंदणीकृत कार्यकारी सदस्य, स्वयंसेवक, स्थानिक रहिवासी, सुरक्षा कर्मचारी, चौकीदार यांचा वैयक्तिक अपघात विमा काढला जातो. कोणतीही अनुचित घटना घडल्यास 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.

गणेश मूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा विमा

लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी ७ कोटी ४० हजार रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. लालबागच्या राजा मंडळाला विद्युत उपकरणे किंवा इतर गोष्टींमुळे नुकसान झाल्यास 2.5 कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. लालबागच्या राजा मंडप परिसरात अपघात झाल्यास 12 कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने केवळ दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा विमा काढला आहे. हे विमा संरक्षण 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर पर्यंत असेल.


हेही वाचा

टाटा पॉवर गणेश मंडळांना निवासी दरात वीजपुरवठा करणार

Ganpati 2023 : आरे तलावात गणपती विसर्जनास बंदी

Related posts