Asia Cup 2023 India Give Target 214 Runs Against Sri Lanka Super 4 Innings Highlights R Premadasa Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023, IND Vs SL Live Updates : वेल्लालागे आणि असलंका यांच्या  भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली. रोहित शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. रोहित शर्मा याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले. वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही. 

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने वेल्लालागे याच्या हातात चेंडू दिला.. त्याने सामन्याचे चित्रच बदलले. वेल्लालागे याने भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिला. वेल्लालागे याने सर्वात आधी शुभमन गिल याला 19 धावांवर बाद  केले. त्यानंतर विराट कोहली याला तंबूत धाडले. कोहली फक्त तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा याला 53 धावांवर बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार भागिदारी केली. पण वेल्लालागे याने राहुल याला बाद करत जोडी फोडली. 

चार दिवसांपासून कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर सामने होत आहेत. त्यातच पावसाचा व्यत्याय त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक बाद केले. वेल्लालागे याच्यानंतर असलंका याने चार विकेट घेतल्या. असलंका याने रविंद्र जाडेजा, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा याने मोहम्मद सिराजच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या वाढवली. शुभमन गिल 19, विराट कोहली 3, हार्दिक पांड्या 5 आणि रविंद्र जाडेजा 4 यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस अक्षर पटेल याने मोहम्मद सिराज याला हाताशी धरत भारताची धावसंख्या 213 पर्यंत पोहचवली. सिराज आणि अक्षर पटेल यांनी 27 धावांची भागिदारी केली. सिराज पाच धावांवर नाबाद राहिला. अक्षर पटेल 26 धावांवर बाद झाला.

रोहित दहा हजारी मनसबदार –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे. खणखणीत षटकार ठोकत रोहित शर्माने दहा हजार धावांचा टप्पा पार केला. वेगवान 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 241 डावात दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्माला वनडेमध्ये पहिल्या दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 82 डाव लागले होते. त्यानंतर पुढील 159 डावात रोहित शर्माने 8000 धावा केल्या आहेत. 

रोहित शर्माच्या नावावर हाही विक्रम –
आशिया चषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा क्रमांक आहे.  रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. आशिया चषकात रोहित शर्मा याने 50 पेक्षा जास्त धावसंख्या दहा वेळा केल्या आहेत, असा पराक्रम करणारा हिटमॅन एकमेव फलंदाज आहे. 

[ad_2]

Related posts