युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी कॉमिक बुकचे प्रकाशन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

युवा मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मी द सुपरहिरो इंडियन सिटिझन’ या कॉमिक बुकचे प्रकाशन करण्यात आले. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी राजभवन मुंबई इथे हा कार्यक्रम पार पडला. 

‘आगम’ या संस्थेने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या सांगण्यावरून हे पुस्तक तयार केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या बुकचे प्रकाशन झाले.    

मतदानाकडे आधी लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. ‘आधी मतदान, नंतर काम’ हे तत्त्व लोकशाहीत प्रत्येकाने पाळले पाहिजे.

महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे काम चांगले सुरू आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मल्टीमीडियाच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदार जागृतीच्या दृष्टीने राज्याने देशासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.

‘आगम’ संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले की, मतदार जागृतीसाठी पुस्तके आणि साहित्य स्थानिक भाषेत असावे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र श्रीकांत देशपांडे, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, ‘आगम’च्या संस्थापक आणि पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि ‘आगम’चे अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा

मालाडचा पी उत्तर प्रभाग दोन भागात विभागला गेला

मनोरीत खारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पामुळे नवीन जलस्रोत होणार निर्माण

[ad_2]

Related posts