Linda Yakarino Will Be New Ceo Of Twitter Will Start Her Work In Few Days Elon Musk Will Resign From His Position Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Twitter CEO Update: ट्विटरच्या (Twitter) नव्या सीईओचा (New Ceo) शोध पूर्ण झाला आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क  या नव्या सीईओच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. नवे सीईओ सहा आठवड्यातच नवे सीईओ आपला पदभार स्विकारणार असल्याचं देखील एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. एलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीची धुरा एका महिलेच्या हाती सोपवणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु मस्क यांनी कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केली नाही आहे. परंतु असे म्हटले जात आहे की या स्पर्धेत एनबासी युनिवर्सलच्या प्रमुख लिंडा याकारिनो (Linda Yakarino) या आहेत. 

वॉल्ट जर्नलच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नव्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

कोण आहेत लिंडा याकारिनो?

लिंडा याकारिनो या 2011 पासून एनबीसी युनिव्हर्ससोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्या कंपनीच्या अध्यक्षपदी असून कंपनीचा कारभार पाहत आहेत. एनबीसी युनिव्हर्सल या कंपनीमध्ये लिंडा याकारिनो या अव्वल  अॅडवरटाइजिंग सेल्स एक्झीक्यूटिव आहेत. याआधी लिंडा या मनोरंजन आणि डिजीटल जाहीरातीच्या विभागात कार्यरत होत्या. टर्नर या कंपनीत देखील लिंडा यांनी 19 वर्ष काम केलं आहे. त्यांनी टर्नर कंपनीच्या प्रमुख पदावर बसून कंपनीचा कार्यभार सांभाळला आहे. लिंडा यांनी पेन स्टेट विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण लिबरल आर्ट्स आणि टेली कम्युनिकेशन क्षेत्रातून पूर्ण केले आहे. 

ट्विटरचा सीईओ बनण्याचं स्वप्न!

बिजनेस इनसाईडरच्या वृत्तानुसार, त्यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितलं होतं की त्यांना ट्विटरचा सीईओ बनयाचे आहे. त्यांनी अनेक वेळा एलॉन मस्क यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच त्या त्यांच्या कामाच्या पद्धतीचे समर्थन देखील करत असतात. त्यामुळे लिंडा याच नव्या सीईओ होतील हे यावरुन स्पष्ट होते. 

ऑक्टोबरमध्ये एलॉन मस्क झाले ट्विटरचे मालक

एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले होते. त्यांनंतर बऱ्याच आक्रमक पद्धतीने त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. त्यामुळे नव्या सीईओकडे जबाबदारी गेल्यावर ट्विटरमध्ये आणखी कोणते बदल घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

[ad_2]

Related posts