karnataka director general of police, कर्नाटक पोलिस महासंचालकांची नवे सीबीआय संचालकपदी नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे प्रवीण सूद? – karnataka director general of police praveen sood appointed as cbi director

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आगामी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे सरकारी आदेश रविवारी प्रसारित करण्यात आले.सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर सूद हा पदभार स्वीकारतील. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी ते या पदावर असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सूद हे कर्नाटक कॅडरच्या १९८६च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असून ते जयस्वाल यांच्यानंतरचे देशातील सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. उच्चस्तरीय समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित करण्यात आले. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधिररंजन चौधरी यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते चौधरी यांनी सूद यांच्या या निवडीवर आक्षेप नोंदवल्याचे समजते. परंतु याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. ‘सुबोधकुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यास सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता आहे’, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आदेशात म्हटले आहे. सूद यांची शैक्षणिक पार्श्वभूमी प्रभावी आहे. त्यांनी आयआयटी दिल्ली, आयआयएम बेंगळुरू आणि न्यूयॉर्कच्या सायराक्युज विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते २०२४मध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांचा आता दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित असेल.
खून करुन करोनाच्या नावावर फाडले बिल; कोर्टाच्या आदेशानंतर १० जणांवर गुन्हा, काय घडलं?
या आधीच्या जबाबदाऱ्या

सूद सध्या कर्नाटकचे पोलिस महासंचालक आहेत. त्या आधी बेल्लारी आणि रायचूर जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे त्यांच्याकडे होती. बेंगळुरू शहरात पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. म्हैसूर शहराचे ते पोलिस आयुक्त होते. मॉरिशस सरकारचे पोलिस सल्लागार म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावले आहे. उत्तम वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांना कार्यक्षम सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना २०११मध्ये ‘नॅशनल ई-गव्हर्नन्स गोल्ड पुरस्कार’ आणि २००६मध्ये ‘प्रिन्स मायकेल इंटरनॅशनल रोड सेफ्टी पुरस्कार’ यांनी गौरवण्यात आले आहे.

[ad_2]

Related posts