Youth Beat Fathers Girlfriend And Set Her On Fire; बाबांच्या गर्लफ्रेंडला मारहाण, पेट्रोल ओतून पेटवलं, महिलेची दुसऱ्या मजल्यावरुन उडी, अन् मग…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओहायो: एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांच्या गर्लफ्रेंडसोबत जे केलं त्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही. त्याने आधी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जीवंत पेटवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील ओहायोमध्ये गुरुवारी ही घटना घडली आहे. रॉबी रॉबिन्सन ज्युनियर असे आरोपीचे नाव आहे. फेअरफिल्ड टाऊनशिप पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महिलेला जाळण्याचा प्रयत्न आणि मारहाणीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे.न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पोलिसांना घटनेदरम्यानचं एक फुटेज देखील मिळाले आहे. ज्यामध्ये आगीत जळणारी महिला मदतीची याचना करताना दिसत आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पीडित महिलेचे वय ५० वर्षे आहे. ती आरोपीच्या वडिलांना डेट करत आहे.

Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत
व्हिडिओमध्ये ही महिला म्हणते की, ‘मला श्वास घेता येत नाहीये! माझे इनहेलर घरी आहे… मला श्वास घेता येत नाहीये.’ पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने आधी तिला खूप मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात तिने दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून उडी मारली. नंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले. त्याला सेकंड डिग्री बर्न झालं आहे. त्यांचे अर्धे शरीर जळाले आहे. ती सुरुवातीला कोमात गेली होती.

घटनेच्या व्हिडिओमध्ये आरोपी रॉबिन्सन वारंवार स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगत आहे. पीडितेला जाळल्याने तो देखील हैराण झाल्याचा प्रयत्न तो करताना दिसत आहे. तो म्हणतो की, ‘काय झाले ते मला माहीत नाही. हे फक्त घडले’. जेव्हा पोलिसांनी त्याला हे सांगितलं की त्या महिलेने खिडकीतून उडी घेतली तेव्हा तो म्हणाला की ‘अरे त्यांनी असं केले.’

बुलढाण्यात अज्ञातांनी क्षणार्धात पेटवली सनरूफ कार, सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला थरार!

घटनेच्या दिवशी खूप उष्णता होती, तरीही तो हिवाळ्यात घातल्या जाणाऱ्या कपड्यांमध्ये व्हिडिओमध्ये दिसला. रॉबिन्सनचे शेजारी डेनिस विल्यम्स म्हणतात की त्यांनी ९११ वर कॉल केला. त्यांनी सांगितले की त्यांची कुत्री भुंकत होती, ते त्याला खिडकीतून उडी मारलेल्या पीडित महिलेपर्यंत घेऊन गेले.

शेजाऱ्याने सांगितलं की, ‘माझी शेजारीण गवतावर पडलेली मला दिसली आणि तिच्या अंगावर माती लागल्यासाखरं दिसलं. मी तिच्याकडे धावत गेलो. तेव्हा ती म्हणाली की, त्याने मला पेटवलं आहे. रॉबिन्सनने हा भीषण हल्ला कोणत्या उद्देशाने केला हे अद्याप कळू शकलेले नाही. त्याला सध्या २ लाख डॉलरच्या बाँडवर बटलर काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Mahakal Temple: अल्पवयीन मुलीचा फोन, पप्पा मला वाचवा… महाकाल मंदिरातील धाग्याने गूढ उकललं

[ad_2]

Related posts