भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक, श्रीलंकेला 41 धावांनी हरवले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>IND vs SL Match Highlights: </strong>कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. भाराताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवलाय.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटागंण घातले. भारताने दिलेल्या 214 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत लंकेच्या फलंदाजीला सूरंग लावला. 73 धावांत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">निशांका 6, करुनारत्ने 2, कुशल मेंडिस 15 , समरमिक्रमा 17 आणि असलंका 22 धावा काढून तंबूत परतले. आघाडी फळी ढेपाळली होती. त्यामध्ये कर्णधार दासुन शनाका यालाही डाव सांभाळता आला नाही. शनाकाला जाडेजाने 9 धावांवर तंबूत पाठवले. 99 धावांत श्रीलंकेने 6 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर धनंजय डीसल्वा आणि वाल्लेलागा यांनी डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण रविंद्र जाडेजाने ही जोडी फोडली. धनंजय 41 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव याने तळाच्या फलंदाजांना जटपट गुंडाळले. &nbsp;वाल्लेलागा 42 धावांवर नाबाद राहिला. कुलदीप यादव याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.</p>

[ad_2]

Related posts