Kunbi Caste Certificate देणं निव्वळ अशक्य?  मराठवाड्यातील Maratha समाजाच्या मागणीला मोठा धक्का?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत असताना एक अतिशय मोठी बातमी आली आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३४ लाख अभिलेखांपैकी केवळ ४ हजार १६० अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली आहे. याचा अर्थ असा की निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर विभागीय आयुक्तांकडे ही आकडेवारी करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता, सरकारने जीआर बदलला नाही तर ९९ टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्यच दिसतंय. मराठा समाज अभ्यासकांच्या दाव्यानुसार, सध्या मराठवाड्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे १ कोटी २० लाख इतकी आहे. मात्र गेल्या ५ वर्षांत केवळ ६३२ जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं दिसून आलं आहे.&nbsp;</p>
<p><br /><br /></p>

[ad_2]

Related posts