सरकार मनोज जरांगे पाटलांना मारू इच्छिते, सरकारला त्यांची कुठलीही चिंता नाही; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP Sanjay Raut Full PC: मराठ्यांना सरसकट आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे, पण अद्याप मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघालेला नाही. याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार मनोज जरांगे पाटलांना मारू इच्छिते, सरकारला त्यांची कुठलीही चिंता नाही, असं म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या उत्तरावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते बंगले कुणाचे हे माहीत नाही, पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे का? हे मुख्यमंत्र्यांना विचारा, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण सुरू आहे. संभाजीनगर येथील बैठकीत अडथळा नको, म्हणून मनोज जरांगे पाटील यांना गुंडाळलं जात आहे. पण तो गुंडाळला जाणारा माणूस नाही. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे, आता का देत नाहीत? असा सवालही राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

विश्वासाचं नातं सरकारसोबत राहिलेलं नाही, असं म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार काही करू इच्छित नाही. सरकार केवळ आश्वासन देतं. हे सरकार मनोज जरांगे पाटील यांना मारू इच्छितं. त्यांना हे सरकार संपवू पाहातंय, असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Full PC : जागावाटपात अडचण नाही, कोणत्याही दबावाला झुकणार नाही : संजय राऊत

ते बंगले कुणाचे हे माहीत नाही पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे? राऊतांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न 

मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या उत्तरावरून संजय राऊतांनी उलटा टोला लगावला आहे. ते बंगले कुणाचे हे माहीत नाही पण त्यांची चावी अजय आशर या बिल्डरकडे आहे का? हे मुख्यमंत्र्यांना विचारा असं राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, आशर हे ठाणे-मुलुंड पट्ट्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. 

इंडिया आघाडीच्या बैठकीला जाऊ नये, म्हणूनच अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस 

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज पहिली बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडी बैठकीत त्या संदर्भात निर्णय झाला. इंडिया आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज दिल्लीत शरद पवारांचे निवासस्थानी होणार आहे. 14 सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाही. आत्ताच माझं त्यांच्या नेत्यांशी बोलणं झालं. आजच बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस देऊन समन्स दिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, केंद्र सरकार रडीचा डाव खेळतंय, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाता येऊ नये म्हणून अभिजीत बॅनर्जींना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

[ad_2]

Related posts