Maharashtra st bus tickets can now be booked through irctc also

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महाराष्ट्रातील राज्य परिवहन बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी बसचे तिकीट आता आयआरसीटीसीद्वारेही बुक करता येणार आहे. तसेच रेल्वे प्रवाशांसाठी एसटी सेवा सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

एसटी महामंडळ आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि IRCTC यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आरक्षण व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात त्यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (https://www.bus.irctc.co.in/) वेबसाइटवरूनही एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.

एकूण रेल्वे प्रवाशांपैकी 75 टक्के प्रवासी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटही बुक करता येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे.


हेही वाचा

[ad_2]

Related posts