भारतातील जागृत देवस्थान; जिथे सत्ता गमावण्याच्या भीतीने नेतेमंडळी टाळतात रात्रीचा मुक्काम

( प्रगत भारत । pragatbharat.com)

The Mystery of Mahakaal Temple: सत्ता संघर्ष आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेले राजकारण ही सत्तेची गणिते आता सर्वसामान्य माणसांनाही कळू लगाली आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षाकडून केलेले प्रयत्नही पाहिले आहेत. मात्र, भारतात असं एक देवस्थान आहे जिथे एक रात्रजरी मुक्काम केल्यास सत्ता बरखास्त होते किंवा सत्ता पालटते, असा दावा केला जातो. आता हा दावा कितपत खरा आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सत्ता गमावण्याच्या भितीने आजही मोठे नेते या शहरात रात्रीचा मुक्काम करत नाही. जाणून घेऊया या शहराविषयी आणि देवस्थानाविषयी. 

मध्यप्रदेशमध्ये असलेल्या उज्जैनमध्ये बाबा महाकाल हे जागृत देवस्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे बाबा महाकालच्या दर्शनासाठी लोक येतात. अनेक बॉलिवूड कलाकार, दिग्गज लोक, राजकारणी, मोठे नेते इतकंच काय तर राष्ट्रपती व पंतप्रधानदेखील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, कधीच राजकारणी या शहरात मुक्काम करत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यामागे एक कारणही सांगण्यात येते. या शहरात जो विश्रांतीसाठी थांबेल त्याची सत्ता जाईल, अशी एक मान्यता आहे.

काय आहे मान्यता?

बाबा महाकालला उज्जेन शहराचे राजाधिराज मानले जाते. बाबा महाकालच्या शहरात कधीच दोन राजे राहू शकत नाहीत. जर असे झाले तर इथे रात्री मुक्काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून सत्ता निघून जाईल, अशी मान्यता आहे. काही घटना अशा घडल्या होत्या ज्यामुळं ही मान्यता खरी मानली जाते. 

भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी उज्जैन शहरात रात्रीचा मुक्काम केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे सरकार पडले होते. तसंच, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही हीच चुक केली होती. त्यानंतर 20 दिवसांतच त्यांना त्यांच्या पदाचा त्याग करावा लागला होता. 

कित्येक वर्षांपासून सुरू आहे ही परंपरा

उज्जैन शहर ही राजा विक्रमादित्य यांच्या कार्यकाळात राजधानी होती. राजा भोज यांच्या कालावधीपासूनच ही मान्यता मानली जाते. तेव्हापासूनच कोणताही राजा रात्री उज्जैनमध्ये विश्रांतीसाठी थांबत नाही. जर ही चूक केल्यास दुसऱ्याच दिवशी सत्ता पालट होते किंवा पदाचा त्याग करावा लागतो. 

पौराणिक कथांनुसार, बाबा महाकाल मंदिराची स्थापना द्वापार युगात झाली होती. 800 ते 1000 वर्ष प्राचीन मंदिर असल्याची मान्यता आहे. मात्र, 150 वर्षांपूर्वी पहिला राणोजी सिंधिया यांचे मुनीम असलेल्या रामचंद्र बाबा शेण बी यांनी मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार केला. त्यानंतर श्रीनाथ महाराज महादजी शिंदे आणि महाराणी बायजाबाई शिंदे यांनी वेळोवेळी या मंदिराचे बांधकाम आणि काही बदल केले. 

Related posts