GT Vs MI IPL 2023 Qualifier 2 1st Innings Highlights Gujarat Titans Sets Target 234 Runs Against Mumbai Indians Shubman Gill

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

GT vs MI IPL 2023 Qualifier 2: शुभमन गिल याच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर गुजरातने तीन विकेटच्या मोबदल्यात 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याने मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. गिल याने 129 धावांची शानदार खेळी केली.  शुभमन गिल 17 धावांवर खेळत होता, तेव्हा मुंबईच्या टीम डेविड याने झेल सोडला. मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवली. मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान आहे. 

शुभमन गिलचे वादळी शतक – 

क्वालिफायर 2 सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. शुभमन गिल याने 60 चेंडूत 129 धावांची फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. गिलच्या झंझावातापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. शुभमन गिल याने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढच्या 17 चेंडूत शतक झळकावले. शुभमन गिल याने 60 चेंडूत 10 षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. यंदाच्या हंगामातील गिलचे हे तिसरे शतक होय. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दमदार सुरुवात केली. साहा लवकर बाद झाला पण.. गिल याने दुसऱ्या बाजूला आपले काम चोख बजावले. गिल याने आजच्या सामन्यात नववी धाव घेताच मोठा विक्रम नावावर गेला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा कराणारा फलंदाज ठरलाय. गिल याने आरसीबीच्या फाफचा विक्रम मोडीत काढलाय. गिल याने 15 सामन्यात 722 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात गिल याने शतकी खेळी करत आठशे धावांचा पल्ला पार केला आहे. 

साई सुदर्शनची संयमी साथ – 

नाणेफेक गमावल्यानंतर साहा आणि गिल यांनी गुजरातच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 38 चेंडूत 54 धावंची भागिदारी केली. पीयूष चावलाने साहा याला 18 धावांवर तंबूत धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. दुसऱ्या विकेटसाठी गिल-सुदर्शन या जोडीने 64 चेंडूत 138 धावांची भागिदारी केली. गिल धावांचा पाऊस पाडत असताना साई सुरद्शन याने एकेरी दुहेरी धावा घेत चांगली साथ दिली. शुभमन बाद झाल्यानंतर साई सुदर्शन याने आक्रमक फलंदाजी केली. साई सुदर्शन 43 धावांवर रिटायर्ट हर्ट होऊन माघारी परतला. त्याने 31 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकाराच्या मदतीने 43 धावांचे योगदान दिले.  अखेरीस हार्दिक पांड्या याने झटपट धावा करत गुजरातची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. राशिद खान पाच धावांवर नाबाद राहिला. 

मुंबईची खराब फिल्डिंग – 

क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईच्या संघाने हराकिरी केली. मुंबईचा खेळाडूंनी सोपे झेल सोडले. कर्णधार रोहित शर्मा याने हार्दिक पांड्या याचा झेल सोडला. टीम डेविड याने शुभमन गिल याचा झेल सोडला… त्यानंतर गिल याने मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. मुंबईच्या फिल्डर्सनी एकेरी दुहेरी धावसंख्याही सोडली. मोक्याच्या सामन्यात मुंबईची फिल्डिंग सामान्य जाणवली.

ऑरेंज कॅप गिलकडेच राहणार – 

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ऑरेंज कॅप शुभमन गिल याच्याकडेच राहणार आता हे जवळपास निश्चित झालेय. आगाडीच्या पाच फलंदाजामध्ये सध्या खेळत असलेल्या संघातील फक्त डेवेन कॉनवे याचाच समावेश आहे. कॉनवेच्या नावावर 625 धावा आहेत. कॉनवेला अजून एक सामना खेळायचा आहे. या एका सामन्यात कॉनवे 150 पेक्षा अधिक धावांचे अंतर भरून काढावे लागेल, हे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅफ शुभमन गिलकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

तिसरे शतक, विराटच्या खास क्लबमध्ये सामील – 

शुभमन गिल याने पहिल्या चेंडूपासून दमदार फलंदाजी केली. गिल याने आठ षटकार आणि चार  चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकाच हंगामात एकापेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल याची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर होता. बटलर आणि विराट कोहली यांनी एकाच हंगामात प्रत्येकी चार चार शतके लगावण्याचा विक्रम केलाय. आता या यादीत गिलचा समावेश झालाय. 

मुंबईची गोलंदाजी प्रभावहीन – 

जेसन बेहरनड्रॉफ याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखलता आल्या नाहीत. प्रत्येक गोलंदाजाने सरासरी प्रति षटक 11 धावा खर्च केल्या. मुंबईकडून आखाश मधवाल आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

[ad_2]

Related posts