Glenn Maxwell And His Wife Are Blessed With A Baby Named Logan Maverick Maxwell See Pic

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Glenn Maxwell Became Father : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल वडील बनला आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मॅक्सवेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहते आणि क्रिकेटपटू मॅक्सवेलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  दरम्यान, ग्लेन मॅक्सवेल याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मुलाच्या जन्माची तारीख आणि त्याचे नाव लिहिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये “11.09.2023 आणि मुलाचे नाव लोगन मॅव्हरिक मॅक्सवेल (Logan Maverick Maxwell)” असे लिहिले आहे.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर करत आई-वडील झाल्याचे सांगितलेय. विनीने एका मुलाला जन्म दिला आहे. विनी आणि मॅक्सवेल यांनी मुलाचे नावही ठेवले आहे. लोगान मवेरिक मॅक्सवेल असे बाळाचे नाव ठेवलेय. ग्लेन मॅक्सवेलच्या पोस्टवर विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात. अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तुमच्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन. दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी सोशळ मीडियावर विनी आणि मॅक्सवेलचे अभिनंदन केले आहे.

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही मॅक्सवेल आणि विनीचे अभिनंदन केले आहे. रायन बर्लसह अनेक सेलिब्रिटींनी मॅक्सवेल आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले आहे. मॅक्सवेल-विनीच्या इंस्टाग्राम पोस्टला अल्पावधीतच 8 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. मॅक्सवेल आणि विनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


दरम्यान, मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने 128 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3490 धावा केल्या आहेत. यासोबतच 60 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 98 टी-20 सामन्यात 2159 धावा केल्या आहेत. यासह 39 विकेट्स घेतल्या आहेत. भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकात मॅक्सवेलचा फॉर्मा ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा असणार आहे. मॅक्सवेलला भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Asia Cup 2023, PAK vs SL: श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी, पाकिस्तानचं आव्हान संपलं



[ad_2]

Related posts