( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुणे मेट्रो पुणेकरांसाठी कायम नवनवीन सुविधा (Pune) उपलब्ध करुन देण्यात येतात. गणेशोत्सव (Pune ganeshotsav 2023) काळात पुण्यात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीवर (Pune Traffic) आता पुणे मेट्रोने उपाय शोधला आहे. आता पुणे मेट्रोने मेट्रोकडून गणपती मेट्रोतून घरी नेण्याची नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला (Ganesh chaturthi 2023) पुणेकरांची वाहतूक कोंंडीतून सुटका होणार आहे आणि प्रवासही सुलभ होणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने ट्विट करुन नियमावली जाहीर केली आहे.
मात्र पुणे मेट्रोकडून नागरिकांसाठी योग्य नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यात काय करावं आणि काय करुन नये, या गोष्टी सांगण्यात आल्या आहे. महत्वाचं म्हणजे मेट्रोचे सर्व नियम पाळून या सुविधेचा लाभ घ्या, असंदेखील आवाहन मेट्रोकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
हे करा
- गणपतीची मूर्ती 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.
- मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या.
- कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या.
- स्थानकावरील लिफ्टचा वापर करा.
- मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्षात घ्या आणि पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा.
- ढोल-ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेले निर्बंधाचे पालन करा, शांतता राखा.
- आपल्यापासून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या.
- स्थानक, फलाट, मेट्रो ट्रे व परिसर अस्वच्छ करु नका.
- एकमेकांना साहाय्य करा व सुरक्षित प्रवास करा.
- जाण्या-येणाच्या मार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या .
हे करु नका
- 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेली गणेश मूर्तीस प्रतिबंध आहे.
- लाऊड स्पीकर, माईक, मेगाफोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर टाळा.
- अनावश्यक गर्दी करु नका.
- गुलाल, फुले, फटके यासारख्या वस्तूंचा वापर टाळा.
- मेट्रो ट्रेनमध्ये कोणत्याही प्रतिबंधित व ज्वलनशील वस्तूंसह प्रवास करु नका.
- मेट्रो ट्रेनमध्ये पूजा, गाणे, आरती, जल्लोष टाळा.
- आकर्षक दिवे, लाईट्सचा वापर टाळा.
- मेट्रो ट्रेनमध्ये व स्थानक परिसरात कोठेही कचरा टाकू नका.
- मेट्रो मालमत्तेचे नुकसान करु नका.
- गणेश मूर्तीजवळ गर्दी करुन उभे राहू नका.
पुणे मेट्रोतुन बाप्पा सोबत प्रवास करताना दिलेल्या सूचनांचे पालन करा…
सुखकर, सुरक्षित प्रवासासह गणेशोत्सव साजरा करा#TravellingWithPuneMetro #Ganeshotsav #ganeshidols #DosandDonts #PuneMetro pic.twitter.com/zwHw9386ZG
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 14, 2023
इतर महत्वाची बातमी-
Histrory Of shivaji Bridge In Pune : ‘या’ पुलाने केली होती पुण्याची पूर्व अन् पश्चिम भागात विभागणी!