IPhone 15 Series Pre Orders Started On 15 September Know In Detail About All Offers And Other Benefits Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Series Pre Orders : नुकतेच Apple कंपनीने आयफोन 15 सिरीज लाँच केली आहे.  ज्यामध्ये Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच केले. तर iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या प्री-आॅर्डर आजपासून भारतात सुरू झााल्या आहेत. तर या फोनची डिलीव्हरी 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्हाला आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स विकत घ्यायाचा असेल तर काय आॅफर आहेत? हे जाणून घ्या.

आजपासूनच iPhone 15 सिरीजच्या प्री-आॅर्डर सुरू झाल्या आहेत. तुम्हाला या सिरीजमधील कोणताही फोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max  22 सप्टेंबरपासून Appleच्या स्टोअरमध्ये (Apple Store) म्हणजेच Apple BKC मुंबई आणि दिल्ली याठिकाणी उपलब्ध  होतील. याठिकाणी जाऊन देखील तुम्ही iPhone 15 बुक करू शकता.

iPhone 15 सर्व सिरीजच्या किंमती

iPhone 15 Pro Max 

256 GB: 1,59,900
512 GB: 1,79,900
1TB: 1,99,990 

iPhone 15 Pro

128 GB: 1,34,990
256 GB: 1,44,990
512 GB: 1,64,990
1TB: 1,84,990 

iPhone 15 Plus

128 GB: 89,990
256 GB: 99,990
512 GB: 1,19,900

iPhone 15

128 GB: 79,990
256 GB: 89,990
512 GB: 1,09,900

iPhone 15 सिरिज आॅफर (iPhone 15 Series Offers)

तुम्ही HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला iPhone 15 Pro आणि Pro Max वर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच, तुम्हाला iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तुम्ही iPhone 14 आणि 14 Plus खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. iPhone 13 वर 3000 रुपये आणि iPhone SE वर 2000 रुपयांची सूट मिळेल. 

कॅमेरा आणि डिस्प्ले माहिती

आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे.  जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्प्ले देण्यात आला आहे.आयफोनच्या प्रो मॉडेल्स (Apple iPhone Pro Models) मध्ये कंपनीने A17 चिप समाविष्ट केली आहे. या चिपमुळे आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल. ही चिप 3-नॅनोमीटर उत्पादन प्रक्रियेवर तयार केली आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts