Mumbai Indians Lost Match Because Of Only 3 Balls ; त्या तीन चेंडूनीच केला मुंबईचा घात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : फक्त तीन चेंडू आणि मुंबईचा पराभव हे गुजरातविरुद्धच्या क्वालिफायर २ च्या सामन्यात पाहायला मिळाले. या तीन चेंडूंनंतर रोहितने हार पत्करली होती आणि त्यावेळीच मुंबईच्या हातून हा सामना निसटला होता.गिलने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासून गुजरातच्या संघाने धावांचा वेग चांगलाच राखला होता. त्यामुळे गिलला कोण बाद करणार, याची चर्चा मुंबईच्या संघात सुरु झाली होती. त्यानंतर रोहिच शर्माने त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, तशी रणनितीही आखली. पण या रणनितीची अंमलबजावणी करता आली नाही आणि तिथेच हा सामना फिरला. कारण गिलला ३० धावावंर बाद करण्याची मुंबईच्या खेळाडूंकडे चांगली संधी होती. कारण सहाव्या षटकात जेव्हा ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गिलचा झेल उडाला होता. पण हा सोपा झेल मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडने सोडला आणि तिथे त्याला पहिले जीवदान मिळाले. त्यानंतर आठव्या षटकात तर गिलला दोन जीवदानं मिळाली. हे षटक कुमार कार्तिकेय टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशनने त्याला यष्टीचीत करण्याची चांगली संधी होती. पण ही संधी गिलले गमावली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा त्याला झेल बाद करण्याची संधी मुंबईच्या संघाकडे आली होती. पण त्यावेळी तिलक वर्माने त्याचा झेल घेण्याची संधी सोडली आणि त्यावेळी गिल हा ३६ धावांवर होता. त्यामुळे गिलला अर्धशतकापूर्वी बाद करण्याची तीन संधी यावेळी मुंबईने सोडल्या आणि त्याचा मोठा फटका मुंबईला बसला.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं


गिलने या संधींचा चांगलाच फायदा बसला. कारण गिलने या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. गिलने यावेळी अर्धशतक नाही तर शतक झळकावले. कारण गिलने यावेळी १२९ धावांची दमदार खेळी साकारली आणि गुजरातच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे मुंबईच्या संघाला या तीन जीवदानांचा मोठा फटका बसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या तीन चेंडूंनी मुंबईच्या हातून सामना गेला.

[ad_2]

Related posts