Bhandara Maharashtra Congress Leader Nana Patole Slams Bjp On Cabinet Meeting In Aurangabad Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भंडारा : भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे असं म्हणत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) टीकास्र सोडलं आहे. तर मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर देखील त्यांनी टीका केलीये. यावर बोलतांना त्यांना म्हटलं की, ‘फाईव्ह स्टारचं कल्चर हे भाजपचं आहे. मराठवाड्याचं त्यांनी पानं उलटून पाहावं. आतापर्यंत औरंगाबादमध्ये जी मंत्रीमंडळाची बैठक झाली ती रेस्ट हाऊस किंवा कमिश्नर ऑफिसमध्ये झाली. पण यांची ही बैठक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात. केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही काय केलं याचा हिशोब आधी द्या. काँग्रेसनं काय केलं हे राज्यातील जनतेला माहित असून तुमची अवस्था फार वाईट आहे.’ 

‘मौजमजा करण्यासाठी औरंगाबादला जातायत’

सरकार मौजमजा औरंगाबादला जाणार असून त्यांना त्यांची ही मौजमजा भारी पडणार असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी म्हटलंय. तर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यावर देखील नाना पटोले यांनी भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘आउट सोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय पदे भरली जाणार आहेत. खरंतर जनेतेची सेवा करण्याचं काम हे सरकारचं असतं. पण अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करुन जनतेची लूट करण्याचा प्रयत्न भाजपचं सरकार करत असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत. तर हे मराठवाड्याला काही देणार नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलतील. आज महाराष्ट्रासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवणं जास्त गरजेचं आहे.’ 

काँग्रेसवर कितीही आरोप केले तरी… – पटोले

‘आणखी किती वर्ष तुम्ही काँग्रेसवर आरोप करणार आहात. आता महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते कळालं आहे. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे देखील जनतेला समजलंय. त्यामुळे आता काँग्रेसवर आरोप करुन काहीही होणार नाही’, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय. यावेळी नाना पटोले यांनी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर देखील निशाणा साधला.  भाजपच्या मंत्र्यांकडून जनतेच्या पैशांची लूट करत असल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय. तर भाजपमध्ये अनेक स्वार्थी माणंस असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी विजकुमार गावित यांच्यावर निशाणा साधलाय. 

राज्यमंत्रीमंडळाची बैठक ही येत्या 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण मंत्रीमंडळ हे औरंगाबादमध्ये जाणार आहे.  सोबतच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील शहरात राहणार आहे. तर, मंत्री मंडळाची बैठक होत असल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : 

मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक! 73 आंदोलने अन् 18 आत्मदहनाचे इशारे; पोलिसांनी मागवल्या 8 हजार अश्रुधुराच्या कांड्या

[ad_2]

Related posts