WhatsApp Chat Ads Now Appear On WhatsApp What Company Said To This Rumours Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp Chat Ads : व्हाॅट्सअॅप हे एक फेमस मेसेंजिंग अॅप आहे. व्हाॅट्सअॅपचा वापर करणाऱ्यांची भारतात संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही वृत्तांनुसार, व्हाॅट्सअॅप आपल्या युजर्सकडून कोणत्याही प्रकारचे पैसे आकारत नाही. त्यामुळेच आता व्हाॅट्सअॅपच्या चॅटदरम्यान जाहिराती दाखवल्या जाणार आणि  कंपनी त्यातून पैसे कमवणार. इन्स्टाग्राम, फेसबुक याठिकाणी मिळत असणाऱ्या जाहिरातींमधून ही कंपनी पैसे कमावते. याच दरम्यान मेटाचे वरिष्ठ अधिकारी विल कॅथकार्ट यांनी याबाबत त्यांच्या Twitter अकाउंटवरून माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी हे मीडिया रिपोर्ट फेटाळून लावले आहे. विल कॅथकार्ट म्हणाले की हे वृत्त खोटे आहे. X वरील पोस्टद्वारे विल यांनी ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसणार अशा प्रकारची बातमी एका मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती. याला रिप्लाय देत कॅथकार्ट यांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.

Whatsapp चं नवीन ‘चॅनेल फीचर’ सादर (Whatsapp’s New ‘Channel Feature’ Introduced)

Meta ने व्हॉट्सअॅपचे एक नवीन फीचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपने भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये चॅनल फीचर लाईव्ह केलं आहे. हे फीचर इंस्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनलप्रमाणेच काम करणार आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने हे अपडेट सादर करत आहे. 

चॅनेलचे वैशिष्ट्य काय आहे? 

व्हॉट्सअॅपचे चॅनल फीचर आधीपासून उपलब्ध असलेल्या ग्रुप आणि कम्युनिटी वैशिष्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने हे फीचर तयार केले आहे. WhatsApp च्या इतर वैशिष्ट्यांप्रमाणे, चॅनेल वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नाही. चॅनेल तयार केल्यावर, कंपनी एडमिनला अनेक प्रकारचे अधिकार देते जे एडमिन त्याच्या चॅनेलमध्ये लागू करू शकतात. जसे की त्यात कोण सामील होऊ शकते, कंटेंट फॉरवर्ड करणे इ. कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी, सर्वात आधी तुमचे अॅप अपडेट करा. आता अॅपवर ओपन करा आणि ‘अपडेट्स’ टॅबवर जा. येथे स्टेटसच्या खाली तुम्हाला वेगवेगळे चॅनेल दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होऊ शकता. जर तुम्ही अजून चॅनल फीचर पाहू शकत नसाल तर तुम्हाला अपडेट होण्याची वाट पाहावी लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या



[ad_2]

Related posts