India Vs Sri Lanka In Asia Cup Final 2023 Washington Sundar Replaces Axar Patel

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषकाच्या फायनलआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेशविरोधात सुपर ४ सामन्यात अक्षर पटेल याने अष्टपैलू खेळी केली होती. बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षरने अखेरपर्यंत लढा दिला होता. रविवारी भारत आणि श्रीलंका संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अक्षर पटेल याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर श्रीलंकेत दाखल झाल्याचेही बीसीसीआय सांगितलेय. फायनलआधी वॉशिंगटन सुंदर टीम इंडियासोबत जोडला आहे. 

अक्षर पटेल याच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढलेय. श्रेयस अय्यर अधीच दुखापतग्रस्त असतानाच आता अक्षर पटेल याचीही भर पडली आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच महत्वाचे दोन खेळाडू जायबंदी झाले आहेत. श्रेयस अय्यर याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पण अक्षर पटेल याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप समोर आलेले नाही. 

 आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे.



[ad_2]

Related posts