Neeraj Chopra Finishes Second Place In Diamond League 2023 Final Vadlejch Wins Gold

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Neeraj Chopra In Diamond League Final: डायमंड लीग 2023 (Diamond League 2023) च्या अंतिम फेरीत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) रौप्यपदक पटकावलं आहे. केवळ 0.44 सेंटीमीटरच्या फरकानं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं अन् नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं सुवर्णपदक जिंकलं. नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भालाफेक केली. अंतिम फेरीतील नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु नीरज 83.80 मीटरच्या पुढे जाऊ शकला नाही. अशातच चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं शेवटच्या प्रयत्नात 84.27 मीटर भालाफेक केली आणि जाकुब वादलेचनं सुवर्णपदक आपल्या नावे केलं. 

नीरज चोप्रा फायनलमध्ये आऊट ऑफ फॉर्म

फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरनं 83.74 मीटर भालाफेक केली आणि त्यानं तिसरं स्थान पटकावलं. डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्रा फॉर्ममध्ये दिसला नव्हता. नीरज चोप्राला दोन प्रयत्नांत स्कोअर करता आला नाही. यानंतर नीरज चोप्रानं उर्वरित 4 प्रयत्नांत 83.80 मीटरचे अंतर पार केले. मात्र, त्यानंतरचे थ्रो अगदी सामान्य होते. चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर पार करून नीरज चोप्राला मागे टाक आघाडी घेतली.  

चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं जिंकला डायमंड लीगचा खिताब 

जाकुब वादलेचननं सहाव्या प्रयत्नात 84.27 मीटर अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला. नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात  83.80 मीटर भालाफेक केली. मात्र त्यानंतर नीरजचा कोणातच प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि तो 83.80 मीटर पुढे जाऊ शकला नाही. नीरज चोप्रा विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरला असता तर तो जगातील तिसरा भालाफेकपटू ठरला असता, पण तसं होऊ शकलं नाही. खरं तर, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नीरज चोप्रानं ज्युरिखमध्ये डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकली होती, परंतु यावेळी तो पराक्रमाची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला.

फायनल्समध्ये कोणत्या अॅथलिटनं किती दूर भालाफेक केली? 

1. जाकुब वादलेच (चेक रिपब्लिक) :  84.24 मीटर

2. नीरज चोपडा (भारत) : 83.80 मीटर

3.ओलिवर हेलँडर (फिनलँड) : 83.74 मीटर

4. एंड्रियन मर्डारे (मोल्डोवा) : 81.79 मीटर

5. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) : 77.01 मीटर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

फायनलआधी भारताला मोठा धक्का, अक्षर पटेल दुखापतग्रस्त, सुंदर श्रीलंकेत दाखल

[ad_2]

Related posts