Nagpur Directorate Of Revenue Intelligence Action Narcotics Worth Lakhs Of Rupees Seized Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : नागपुरात (Nagpur) महसूल गुप्तचर संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 211 किलोंचा गांजा जप्त करण्यात आलाय. याची एकूण किंमत ही  42 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवार ( 16 सप्टेंबर ) रोजी नागपूरच्या  महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली. शनिवार ( 16 सप्टेंबर) रोजी पहाटे नागपूर जवळ मौदा टोल येथे एका ट्रॅक्टरला रोखण्यात आले. हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह होता. त्यामुळे ट्रॅक्टरसह ट्रॉलीचे देखील काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आले. त्यानंतर त्या ट्रॉलीच्या खाली एक अंगभूत पोकळी असल्याचं लक्षात आलं. 

त्यानंतर त्या भागाची देखील पाहणी करण्यात आली. तर या पोकळीमध्ये 100 वेगवेगळे पॅकेट्स आढळून आले. त्यामध्ये  42.2  लाख रुपयांचा गांजा सापडला. याचं एकूण वजन 211 किलो इतकं असल्याचं समोर आलं. या वाहनातून प्रवास करत असणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला. 

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक

नागपुरात ही कारवाई होत असतानाच देशात देखील एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशात कार्यरत असलेल्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालयानला हे मोठं यश मिळालं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. हा नागरिक  ड्रग्स तस्करीच्या सिंडिकेटचा मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येत आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने यापूर्वी  8 जून रोजी कुरिअर टर्मिनलमधून 500 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. तसेच मुंबईतील नालासोपारा परिसरातून काळजीपूर्वक नियोजित नियंत्रित वितरण ऑपरेशन दरम्यान दोन लोकांना अटक केली होती. 

अटक केलेल्या आरोपीची सातत्याने चौकशी करण्यात येत होती. तसेच त्यांच्याकडील  डिजिटल उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण देखील करण्यात आले. यामुळे तो ड्रग सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. तसेच तो नवी दिल्लीतून कार्यरत असल्याचं देखील समोर आलं.  दोन महिन्यांच्या  अथक प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांना आरोपीचे योग्य ठिकाण शोधता आले. त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी  सापळा रचून या सूत्रधाराला नवी दिल्लीतील उत्तम नगर परिसरातून ताब्यात घेतलं. 

या मास्टरमाईंडला अटक करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर शनिवार (16 सप्टेंबर) रोजी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. अधिक चौकशीसाठी या मास्टरमाईंडला डीआरआय कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Yavatmal News : जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड…बचावासाठी पळणं युवकाच्या जीवावर बेतलं; गावकऱ्यांचा पोलिसांवर आरोप

[ad_2]

Related posts