Asia Cup 2023 Final India Won 10 Wickets 8th Time Champions Against Sri Lanka Full Match Highlights R Premadasa Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs SL Final, Match Highlights : मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरलेय. कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव ५० धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.  भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे. 

श्रीलंकेने दिलेले ५१ धावांचे माफक आव्हान भारताने ६.१ षटकात आरामात पार केले. भारताने दहा विकेटने श्रीलंकेचा पराभव केला. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद ५१ धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.  शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली.

सिराजचा विकेटचा षटकार, हार्दिकच्या तीन विकेट, श्रीलंकेचा अवघ्या 50 धावांत खुर्दा

कोलंबो येथे सुरु असलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. सिराज आणि हार्दिकच्या माऱ्यापुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांत आटोपला. मोहम्मद सिराज याने सहा फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.  कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर मोहम्मद सिराज नावाचे वादळ आले होते. या वादळापुढे गतविजेत्या श्रीलंकेने लोटांगण घातले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने भेदक मारा केला.  सिराजच्या माऱ्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद सिराज याने आघाडीच्या सहा श्रीलंकन फलंदाजांना तंबूत धाडले. तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह याने एक विकेट घेतली. श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.  

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांन लोटांगण घातले. जसप्रीत बुमराह याने विकेट घेत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक सहा विकेट घेतल्या. सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या दहा षटकांच्या आत पाच विकेट घेण्याचा पराक्रम झालाय. असा पराक्रम करणारा सिराज एकमेव भारतीय गोलंदाज आहे.  हार्दिक पांड्या याने अखेरच्या तीन फलंदाजांन तंबूचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले. मोहम्मद सिराजने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजनेही एक षटक मेडन टाकले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या.  इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.  श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. तर चार फलंदाजांन दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निसांका २, परेरा ०, समरविक्रमा ० असंलका ०, डी सल्वा ४ आणि शनाका ० धावांवर तंबत परतले. आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

 

[ad_2]

Related posts