सरकारच्या कंत्राटी जीआरची करणार होळी; राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून उद्या राज्यभरात आंदोलन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
छत्रपती संभाजीनगर : सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस (शरद पवार गट) उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहे. तर, राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून सरकारच्या कंत्राटी जीआरची होळी करून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी दिली आहे.

याबाबत मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मुळात असंवैधानिक आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का? असे शेख म्हणाले.

तसेच, अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. कुणाचं तरी उखळ पांढरं करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे असा याचा अर्थ होतो. एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही, म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची ही फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे. त्यामुळे या युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात राज्यातील प्रत्यक शहरातील मुख्य चौकात उद्या 18 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेख म्हणाले.

असे असणार आंदोलन…

तसेच या आंदोलनात रिकाम्या खुर्च्यांवर कंत्राटी पंतप्रधान, कंत्राटी मुख्यमंत्री, कंत्राटी उपमुख्यमंत्री-1, कंत्राटी उपमुख्यमंत्री-2 आशा चिठ्या चिकटवू ठेऊन निदर्शने करण्यात येतील. त्या वेळी या शासनाच्या जीआरची होळी करण्यात येईल व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येतील. ज्यात, "रद्द करा रद्द करा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा.. रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा… भाजपा हटावा, नोकऱ्या वाचवा…कंत्राटी मुख्यमंत्री भरा पण नोकऱ्या परंमनंट करा…कंत्राटी सरकार हाय..हाय…रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा..भाजपा हटावा..नोकऱ्या वाचवा.., अशा घोषणा दिल्या जाणार असल्याचे शेख म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या :

Sharad pawar Road Show In Pune : अजित पवारानंतर शरद पवार उतरणार मैदानात ; ‘या’ तारखेला पुण्यात करणार ‘पावरफुल्ल’ रोड शो

[ad_2]

Related posts