Asia Cup 2023 Final Match Team India Prize Money After Winning Trophy And Sri Lanka Team Prize Money As Runner Up Team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय (India vs Sri Lanka) मिळवला. भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाज पत्त्यांसारखी कोसळली. श्रीलंकेचा पराभव करत भारताने पाच वर्षांनंतर आशिया कपवर नाव कोरलं. भारताने सर्वाधिक 263 चेंडू राखून श्रीलंकेवर विजय मिळवत नवा विक्रम रचला. या दमदार विजयानंतर विजेत्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. सामन्यात भेदक मारा करुन सहा विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (Player of The Match) पुरस्कार देण्यात आला.

विजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम किती? 

श्रीलंकेला टीम इंडियाने फक्त 50 धावांमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेचे अवघ्या 15.2 षटकांत सर्व गडी बाद झाले. भारताने 51 धावांचं लक्ष्य केवळ 6.1 षटकांत पूर्ण केलं आणि दणदणीत विजय मिळवला. आशिया चषक 2023 विजेत्या टीम इंडियाला 1,50,000 डॉलर्स (US$) बक्षीस म्हणून मिळाले. 1,50,000 यूएस डॉलर्स म्हणजे 1,24,63,552 रुपये. यासोबतच उपविजेत्या श्रीलंकेच्या संघाला म्हणून 75,000 डॉलर्स (US$) रक्कम म्हणजेच सुमारे 62,31,776 रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. 

कुलदीप यादव ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’

आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला. आशिया कप 2023 मध्ये कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात चार बळी घेतले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कुलदीप यादवला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब देण्यात आला. यासोबत त्याला 15,000 यूएस डॉलर्स म्हणजे सुमारे  12,46,355 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. 

मोहम्मद सिराज ठरला ‘सामनावीर’

मोहम्मद सिराजने या सामन्यात 6 विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला 50 धावांपर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यातील विजयी कामगिरीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार (Player of The Match) देण्यात आला. मोहम्मद सिराजला यासोबत म्हणून 5,000 डॉलर्स (US$) म्हणजे सुमारे 4,15,451 रुपये बक्षीस मिळाले. महत्त्वाचं म्हणजे सिराजने हे रोख बक्षीस ग्राउंड्समनला देण्याचा मोठा निर्णय घेतला. कोलंबोमध्ये आशिया कप 2023 दरम्यान पावसामुळे ग्राऊंड्समननी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची आठवण आणि कौतुक म्हणून सिराजने बक्षीसाची रक्कम ग्राउंड्समनला दिली. सिराजच्या या दानशूरपणाचं खूप कौतुक होत आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या वतीने, श्रीलंकेच्या मैदानी स्टाफ म्हणजेच ग्राउंड्समनला त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बक्षीस म्हणून 50,000 डॉलर्स (US$) रक्कम म्हणजे सुमारे 41,54,517 रुपये देण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts