CSK Squad And Most Dominant Players This Season IL 2023 Ms Dhoni Ravindra Jadeja Tushar Deshpande

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023, CSK : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चेन्नईने दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत दमदार फिल्डिंग चेन्नईची जमेची बाजू आहे. त्याशिवाय धोनीचे नेतृत्वात चेन्नचा एक्स फॅक्टर आहे. चेन्नईसाठी फलंदाजीत कॉनवे-ऋतुराज जोडी हिट ठरली तर गोलंदाजीत तुषार याने आतापर्यंत सर्वाधिक विकेट दिल्यात. रविंद्र जाडेजा याने अष्टपैलू खेळीने सर्वांची मने जिंकली आहेत. पाहूयात यंदा चेन्नईसाठी कोणत्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली…

फलंदाजीत वरचढ कोण ?

सलामी जोडी चेन्नईच्या फलंदाजीची सर्वात मोठी ताकद आहे. त्याशिवाय शिवम दुबे याची फटकेबाजी चेन्नईला मिळालेला बोनस आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी आतापर्यंत खोऱ्याने धावा काढल्या आहेत. कॉनवे याने १४ डावात ६२५ धावांचा पाऊश पाडलाय. ५३ च्या सरासरीने कॉनवे याने धावा काढल्यात. कॉनवे याने सहा अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराज गायकवाड याने १४ सामन्यात ५६४ धावा काढल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकाचा समावेश आहे. कॉनवे आणि ऋतुराज आयपीएलमधील सर्वोत्तम सलामीजोडीपैकी एक आहे. चेन्नईला चांगली सुरुवात देण्याच काम या जोडीने केलेय. 

शिवम दुबे चेन्नईसाठी एक्स फॅक्टर ठरलाय. शिबम दुबे याने मधल्या षटकात १६० च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्यात. दुबेच्या बॅटमधून आतापर्यंत ३३ षटकार निघाले आहेत.  शिवम दुबे याने आतापर्यंत १३ सामन्यात ३८६ धावा काढल्या आहेत.  अजिंक्य रहाणे याने १७५ तर जाडेजा याने १७५ धावा काढल्या आहेत. चेन्नईकडून सर्वाधिक षटकार शिवम दुबेच्या नावार आहेत. दुबे याने ३३ षटकार लगावलेत. त्याशिवाय ऋतुराज गायकवाड याने २९, कॉनव याने १६, अजिंक्य रहाणे याने १४ आणि धोनीने १० षटकार मारलेत.

गोलंदाजांची दमदार कामगिरी  – 

दीपक चाहर याच्या अनुपस्थितीत सुरुवातीच्या सामन्यात तुषार देशपांडे याने चेन्नईसाठी दमदार कामगिरी केली. तुषार देशपांडे याने आतापर्यंत २१ विकेट घेतल्या आहेत. तुषार देशपांडे सुरुवातीला महागडा ठरत होता. प्रतिषटक १२ धावा खर्च केल्या.. पण मागील काही सामन्यात तुषार याने कंजूष गोलंदाजी केली आहे. तुषार देशपांडे याला मथिशा पथिराणा याने चांगली साथ दिली आहे. पथिराणा याने ११ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. पथीराणा याने विकट घेण्यासोबत धावाही रोखण्याचे काम केलेय. अखेरच्या दहा षटकामध्ये पथीराणा गोलंदाजी करतो.. त्यावेळी तो प्रतिषटक आठ पेक्षा कमी धावा खर्च करतो. तुषार देशपांडे आणि मथिशा पथीराणा यांच्या जोडीला आता दीपक चाहरही आलाय. चाहर याने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन केलेय. चहर याने ९ सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. 

रविंद्र जाडेजा याने फिरकीची धुरा यशस्वी सांभळली आहे. जाडेजा याने १९ विकेट घेतल्या आहेत. १५ सामन्यात रविंद्र जाडेजा याने भेदक मारा केलाय. मधल्या षटकात रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  रविंद्र जाडेजा याला महिश तिक्ष्णा याने उत्तम साथ दिली आहे.  तिक्ष्णा याने ११ विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जाडेजा आणि तिक्ष्णा यांनी विकेट घेण्यासोबत धावाही रोखण्याचे काम चोख बजावलेय. 

मोईन अली याने ९ विकेट घेतल्या आहेत. आकाश सिंह याने पाच विकेट घेतल्या आहेत. मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगारकेकर यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या आहेत. सिसांदा मागला याने एक विकेट घेतली. 

चेन्नईकडून सर्वाधिक निर्धाव चेंडू तुषार देशपांडे याने फेकले आहेत. तुषार देशपांडे याने आतापर्यंत १३३ निर्धाव चेंडू फेकले आहेत रविंद्र जाडेजा याने १०४ चेंडू निर्धाव टाकलेत. तर मथिशा पथिराणा याने ९७ आणि तिक्ष्णा याने ७९ निर्धाव चेंडू टाकलेत. चाहर याने ७७ निर्धाव चेंडू फेकलेत.

आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण  स्क्वाड –

एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी 

[ad_2]

Related posts