IND Vs AUS ODI Series Indian Team For The Australian ODI Series Will Be Picked Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India’s squad for the Australian ODI series : विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. आज भारतीय संघाची निवड होणार आहे.  रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे. दोन्ही संघाना खेळण्यासाठी अखेरचे तीन सामने असतील. त्यानंतर विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. 

वनडे विश्वचषकाला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. त्याशिवाय दोन सराव सामने असतील. त्यामुळे विश्वचषकाआधी संघ नियोजन करण्यासाठी फक्त पाच सामन्याचा कालावधी असेल. ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियाच्या काही सिनिअर खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. विश्वचषकात खेळणाऱ्या बॅकअप खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी साडेआठ वाजता रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांची पत्रकार परिषद आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सततच्या दुखापतीमुळे अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याशिवाय सूर्यकुमार यादव याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वारंवार संधी दिल्यानंतरही सूर्याला मोठी खेळी करता आली नाही.  सूर्या आणि श्रेयस यांच्यासाठी ही मालिका महत्वाची असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक –

आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.

भारताविरोधात वनडे मालिकेसाठी  ऑस्ट्रेलियाची टीम:

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा. 



[ad_2]

Related posts