[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी (Special Session) केंद्रीय मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) ही बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये संसदेच्या अधिवेशन जुन्या संसद भवनातून नव्या संसदेत सुरु करण्यासाठी स्वीकृती दिली जाईल. याशिवाय मंत्रीमंडळाच्या या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण ही बैठक विशेष अधिवेशनादरम्यान बोलावण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळाविषयी आणि देशाची संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी देखील झाली बैठक
सोमवार (18 सप्टेंबर) रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मंत्र्यांची बैठक बोलावली. ही बैठक संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी यांच्या दालनात बोलावण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये मत्री प्रह्लाद जोशी, धर्मेंद प्रधान, भूपेंद्र यादव,अनुराग ठाकुर, अर्जुन राम मेघवाल आणि वी मुरलीधरन देखील उपस्थित होते.
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला (18 सप्टेंबर) रोजी सुरुवात झाली आहे. तसेच हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात ही संसदेच्या जुन्या इमारातीमध्ये झाली. तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीमध्ये अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाविषयी भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणादरम्यान खासदार, माजी पंतप्रधान, पत्रकार आणि संसदेत विविध सेवांमध्ये गुंतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला आणि त्यांचे आभार मानले. जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात सुरु होत असलेल्या प्रवासविषयी बोलतांना पंतप्रधान मोदी हे भावून झाले होते.
नव्या संसद भवनात सुरु होणार कामकाज
सोमवार (19 सप्टेंबर) रोजी संसदेचं कामकाज हे नव्या संसद भवनात सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं येत आहे. तसेच सोमवारीच संसदीय बुलेटिन जारी करून राज्यसभेने दोन्ही सभागृहांच्या सर्व खासदारांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सामूहिक छायाचित्र काढण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच या विशेष अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Parliament Special Session : ईडी, सीबीआय ते वॉशिंग मशीन; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा
[ad_2]