[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : सध्या बाप्पाच्या (Ganeshostav) आगमनाची तयारी घरोघरी सुरु आहे. वर्षभर ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या लाडक्या बाप्पाचा सण अखेरीस आला आहे. त्यामुळे सध्या मंगलमय आणि प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळतय. खरतरं बाप्पाला अनेक नावांनी ओळखलं जातं, पुजलं जातं. विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता, ज्याचे उदर लंब आहे असा लंबोदर, ज्याचे कान सुपासारखे आहेत तो शूर्पकर्ण अशा अनेक नावांनी बाप्पा आपल्या परियचयाचा आहे. पण काही नावं अशी आहेत, ज्यांच्याविषयी क्वचितच आपल्याला माहिती असेल.
गणपतीच्या प्रत्येक नावाची काहीतरी गोष्ट आहे, महत्त्वपूर्ण असा अर्थ आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नावाला तितकच महत्त्व आहे. तुम्ही कधी चतुर्होत्र, गुहाग्रज, सुराग्रज, हेमतुण्ड या नावांविषयी ऐकलं आहे का? ही नावं दुसऱ्या कोणाची नाही तर आपल्या लाडक्या बाप्पाचीच आहेत. याचा नावांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बाप्पाच्या ‘या’ नावांविषयी माहिती आहे का?
गणपतीची जितकी नावं घ्यावीत तितकी कमी आहेत. पण सुमुख, गुहाग्रज, हेरंब, चतुर्होत्र, सर्वेश्वर, विकट, हेमतुण्ड, वटवे, सुराग्रज अशी देखील काही बाप्पाची नावं आहेत. यातील काही नांवाचा अर्थ देखील तितकाच परिपूर्ण आहे. ज्याचे मुख सुंदर आहे असा सुमुख, जो सर्व देवांमध्ये अग्रगण्य पुजला जातो तो गुहाग्रज, जो विनम्रतेचे पालनक करत तो हेरंब, संकटांचा नाश करणारा विकट, असा अर्थ यातील काही नावांचा आहे. त्यामुळे बाप्पाच्या इतर नावांसोबत या नावांचेही तितकेच महत्त्व आहे. या प्रत्येक नावाची गोष्ट देखील आहे. जशी एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता या नावांची गोष्ट आहे.
तर असे अनेक गणपती आहेत ज्यांच्या नावांचा इतिहास हा अतिशय रंजक आहे. पुण्यातील असे अनेक गणपती त्यांच्या नावांमुळे प्रसिद्ध आहे. पुण्यातील चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, माती गणपती हे गणपती त्यांच्या नावांसाठी प्रामुख्याने ओळखले जातात. ही नावं पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरुन दिली असल्याचं देखील म्हटलं जातं.
मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी झाली असून पुढील दहा दिवस गणपतीचा पाहुणचार करण्यात येणार आहे. हा हक्काचा पाहुणचार घेण्यासाठी बाप्पा देखील घरोघरी विराजमान होईल.
हेही वाचा :
Pune Ganeshotsav 2023 : चिमण्या, मद्रासी, गुपचूप, मोदी, माती गणपती; पुण्यातील गणपती मंदिरांना ही हटके नावं कशी पडली?
[ad_2]