Washim Maharashtra Farmer Loss Due To Street Light In Washim Village Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वाशिम : आधीच दुष्काळाचं संकट त्यात आता वाशिममधील शेतकऱ्यांवर एक नवं संकट ओढावलं आहे. वाशिममधील (Washim) महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. विकासासाठी पर्यावरणावर अनेक वेळा घाव घालण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पर्यावरणाची बरीच हानी झाल्याचं चित्र देखील आहे. पण आता हाच विकास शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असल्याचं वाशिममध्ये दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात अकोला ते नांदेड चौपदरीकरण महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलावर अनेक दिवे लावण्यात आले आहेत. याच दिव्यांचा त्रास पिकांना होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

वाशिममधील जांभूरून गावातील शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे.  वाशिम जिल्ह्यातील अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा त्रास हा पिकांना होत असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय. या महामार्गावर 200 फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.  रात्रभर सुरु राहणाऱ्या या दिव्याच्या प्रकाशाकडे अनेक किडे आकर्षित होतात. त्यामुळे परागीकरणची प्रक्रिया थांबली गेलीये. याच कारणामुळे पिकाला फुलधारणा आणि शेंगा येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  याचा परिणाम म्हणजे शेकडो एकरवरील पीकं धोक्यात आली आहेत. 

शेताजवळूनच हा रस्ता झाल्याने विकासाचा मार्ग तर मोकळा झाला. कारण यामुळे शेतात ये-जा करणं आणि शेतमाल आणणं शेतकऱ्यांसाठी सोपं झालं. पण याच विकासामुळे शेतकऱ्यांच नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतयं. तर यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. पुढील अनेक दशके दिव्यांचा हा प्रकाश असाच राहणार आहे. त्यामुळे त्या पट्ट्यातील शेतामध्ये परागीकरणाची पक्रिया होण्यास मात्र अडचण निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर कोणतातरी कायमस्वरुपी निकाल लावणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी देखील विश्लेषण केलं आहे. तर तापमान वाढ आणि प्रकाशमान यांचा परिणाम पिकांवर होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तसेच याचा परिणाम रब्बी आणि खरीपाच्या पिकांवर होणार असल्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता यावर स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. शेतकऱ्यांची मागणीवर सरकार विचार करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : 

Farmer Success Story: वाशिमच्या शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीच्या शेतीतून शोधला आर्थिक समृद्धीचा मार्ग; एका एकरातून दोन महिन्यात लाखमोलाची कमाई

[ad_2]

Related posts