[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Parliament Special Session: देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवं संसद भवन (Parliament of India) सज्ज झालं आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर दुपारचं जेवण होईल आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात घेऊन जातील.
राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, “भारतीय संसदेच्या समृद्ध वारशाचं स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती आहे. दुपारी 1 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहावं.”
मनमोहन सिंह, मेनका गांधींना विशेष आमंत्रण
सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी स्वागताचं पहिलं भाषण करतील आणि त्यानंतर काही ज्येष्ठ खासदार उपस्थितांना संबोधित करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार मेनका गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमात त्या पहिल्या वक्त्या असतील.
मनमोहन सिंह यांनाही आमंत्रण
मेनका गांधी यांच्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मनमोहन सिंह यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की, माजी पंतप्रधानांची प्रकृती काही दिवसांपासून ठिक नसल्यानं या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं जाणार
पंतप्रधान मोदी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राज्यघटनेची प्रत घेऊन जातील, अशीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं जाऊ शकतं. महिला आरक्षण विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) सविस्तर चर्चा होणार असून बुधवारीच हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशन आज नव्या इमारतीतून कामकाज सुरू केले जाणार, याकरिता सेंट्रल हॉलपासून मोदी नव्या संसदेपर्यंत पायी जाणार असून त्यावेळी सर्व भाजप खासदारही मोदींसोबत पायी चालणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
जुन्या संसद भवनात फोटो सेशन
सेंट्रल हॉलमधील सोहळ्यापूर्वी जुन्या संसद भवनाच्या प्रांगणात तीन वेगवेगळ्या गटांचे फोटो घेण्यात येणार आहेत. पहिला फोटो राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांचा असणार आहे. तर दुसरा राज्यसभा सदस्यांचा आणि तिसरा लोकसभा सदस्यांचा असेल. दरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपारी 1.15 वाजता नवीन इमारतीत सुरू होईल, तर राज्यसभेची बैठक दुपारी 2.15 वाजता होईल.
दरम्यान, ज्येष्ठ केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांनी वैयक्तिकरित्या समारंभाच्या व्यवस्थेची देखरेख केली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सेंट्रल हॉलला भेट दिली. नवीन संसद भवनातील कामकाज गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होत आहे, जे कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी शुभ मानलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Modi Cabinet Decisions: महिला आरक्षण विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी, सूत्रांची माहिती, आज नव्या संसदेत सादर होण्याची शक्यता
[ad_2]