Prithvi Shaw And Rumored Girlfriend Nidhi Tapadia First Time Seen Publically Together in IIFA 2023; क्रिकेट-बॉलिवूडचा पुन्हा जुळलं सूत! पहिल्यांदाच कथित GF सोबत दिसला पृथ्वी शॉ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शॉचे नाव अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडियासोबत जोडले जात आहे. निधी ही त्याची कथित गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जाते. सोशल मीडियावर हे कपल एकमेकांच्या फोटोंवर भरपूर कमेंट करताना दिसले आहे. पण आता पहिल्यांदाच शॉ निधीसोबत अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसला आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत.पृथ्वी शॉ पहिल्यांदा निधीसोबत दिसला

स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉने कथित गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत प्रथमच आयफा २०२३ मध्ये सार्वजनिकपणे हजेरी लावली. खरं तर, पृथ्वी आणि निधी अबुधाबीमध्ये आयफा रॉक्स इव्हेंटमध्ये ग्रीन कार्पेटवर एकमेकांसोबत दिसले होते. दोघांनीही यामध्ये ट्वीननिंग करून आले. निधीने काळ्या रंगाची साडी नेसली होती. यासोबतच तिने गळ्यात हिऱ्याचा चोकरही घातला होता.

फॉर्मल लूक सोडून पृथ्वी कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला. त्याने काळा शर्ट, काळा कार्गो आणि काळ्या रंगाचे ओव्हरसाईज जॅकेट घातले होते. काळ्या आऊटफिटमध्ये दोघेही छान दिसत होते. आयफा रॉक्स इव्हेंटमध्ये बॉलिवूडमधील दिग्गजांनी देखील हजेरी लावली.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

शॉने व्हॅलेंटाइन डे ला…

या वर्षाच्या सुरुवातीला, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी, पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवर निधी तापडियासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कॅप्शनमध्ये शॉने लिहिले होते, ‘Happy Valentines Day my wife’. पृथ्वीची ही स्टोरी त्यावेळी खूप गाजली होती. मात्र, काही वेळाने खेळाडूने ती स्टोरी डिलीट केली होती. इतकाच नाही तर दिल्ली कॅपिटल्सच्या अखेरच्या सामन्यात निधीने हजेरी लावली होती. या सामन्यात पृथ्वी शॉने शानदार अर्धशतक झळकावले होते. तेव्हा निधीची इंस्टाग्राम स्टोरी आणि अर्धशतक झळकवल्यानंतर पृथ्वीने दिलेली पोझ चर्चेचा विषय ठरली.

[ad_2]

Related posts