[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
NITI Aayog Meeting: नवी दिल्लीत (New Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची आठवी बैठक (NITI Aayog meeting) शनिवारी 27 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘विकसित भारत @2047: रोल ऑफ टीम इंडिया’ हा यंदाच्या बैठकीचा विषय आहे. परंतु या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता या मुख्यमंत्र्यांना त्यांनी टाकलेला बहिष्कार हा महागात पडू शकतो असं सांगितलं जात आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडून निती आयोगाच्या बैठकीवर जो बहिष्कार टाकण्यात आला तो त्यांनी राज्याच्या विकासावर टाकला आहे असं म्हटलं जात आहे. तसेच या बैठकीत जवळपास 100 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यामुळे जी राज्यं या मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करु शकणार नाहीत ती राज्य पराभवाच्या दिशेने वाटचाल करतील.
निती आयोगाच्या बैठकीचा उद्देश
सूत्रांनी म्हटले की, या बैठकीदरम्यान 2047 पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवणे, देशातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक वाढवणे, महिला सशक्ताकरण, आरोग्य आणि पोषण, कौशल्य विकास यांना प्रोत्साहन देणाऱ्या मुद्द्यांवर भर देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच निती आयोगाची ही बैठक केंद्र आणि राज्याच्या प्रमुख विकास कामांच्या मुद्द्यांवर एकत्रित चर्चा करुन आणि त्यावर तोडगा काढण्याची संधी देते.
Reels
[ad_2]