IPL Title Winners List From 2008 To 2022 Ipl 2023 Finals Are Here Which Teams Have Won The Finals Since 2008 How Did It Turn Out

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Title Winners List from 2008 to 2022 : अवघ्या काही तासांत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेत मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर १ मध्ये गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण गुजरातने क्वालिफायर २ मध्ये मुंबईचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. 

३१ मार्चपासून सुरु झालेला रनसंग्राम २८ मे रोजी थांबणार आहे. १० संघामध्ये दोन महिन्यापासून लढत सुरु आहे. चेन्नई की गुजरात कोणता संघ चषक उंचवणार.. याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळ अंतिम सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे होणारा हा सामना उद्या (रविवार) सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

चेन्नई पाचव्यांदा चषकावर नाव कोरणार की गुजरात दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणार… याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चेन्नईला सर्वाधिक चषक जिंकणाऱ्या मुंबईची बरोबरी करण्याची संधी आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. आता चेन्नईला याची बरोबरी करण्याची संधी आहे. रविवारी आपल्याला सोळाव्या हंगामाचा विजेता मिळेल, पण आतापर्यत १५ आयपीएल हंगामात कुणी कुणी विजय मिळवला.. याबाबत जाणून घेऊय़ात.. 

2008 

आयपीएलच्या पहिल्या चषकावर राजस्थानने नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न याने राजस्थानला जेतेपद मिळवून दिले होते. चेन्नईचा संघ उपविजेता ठरला होता. राजस्थानने चेन्नईचा तीन विकेट राखून पराभव केला होता. राजस्थान याला त्यानंतर एकदाही चषकावर नाव कोरला आले नाही.  2008 च्या विजेत्या राजस्थान संघात रविंद्र जाडेजा होता. 

2009 

डेक्कन चार्जस संघाने २००९ मध्ये चषकावर नाव कोरले होते. आरसीबीचा सहा धावांनी पराभव करत डेक्कन चार्जस संघाने चषकावर नाव कोरले होते. या संघामध्ये रोहित शर्मा याचा सहाभाग होता. 

2010

चेन्नई संघाने प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला होता. 

2011

धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. या हंगामात आरसीबी उपविजेता राहिली. चेन्नईने अंतिम सामन्यात आरसीबीचा ५८ धावांनी विराट पराभव केला होता. 

2012

गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने प्रथमच चषकावर नाव कोरले.  चेन्नईनेच्या लागोपाठ तिसऱ्या विजयाचे स्वप्न केकेआरने मोडले. रोमांचक सामन्यात कोलकात्याने बाजी मारली होती.

2013

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. मुंबईने धोनीच्या चेन्नईचा पराभव करत चषक उंचवला. अंतिम सामन्यात १४९ धावांचे आव्हान चेन्नईला गाठता आले नाही. चेन्नईचा संघ १२५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

2014

गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकात्याने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पंजाब संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला होता.. पण फायनलमध्ये त्यांना कोलकात्याचा अडथळा दूर करता आला नाही.  १९९ धावांचे आव्हान कोलकात्याने आरामात पार करत चषक उंचावला. 

2015

चेन्नईचा पराभव करत मुंबईने चषकावर नाव कोरले. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल चेन्नईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने हा सामना ४१ धावांनी जिंकला.

2016

आरसीबीचा पराभव करत हैदराबादने चषकवर नाव कोरले. हैदराबादची ही दुसरी ट्रॉफी असली तरी सनरायझर्स हैदराबादची ही पहिलीच ट्रॉफी आहे. भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहली याने या हंगामात चार शतकांच्या मदतीने ९७० धावा चोपल्या होत्या. पण आरसीबीला हैदराबादकडून आठ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

2017 

मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पण यावेळी चेन्नई नव्हे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या सामन्यात मुंबईने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मुंबईविरोधात चेन्नईचा संघ नव्हता.. पण धोनी होता.. धोनी पुणे संघाचा कर्णधार होता. 

2018

2010 आणि 2011 नंतर चेन्नईचा अनेकवेळा फायनलमध्ये पोहचला होता. पण त्यांना जेतेपद मिळवता आले नव्हते. पण २०१८ मध्ये चेन्नईने हैदराबादचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने दणक्यात पुनरागमन केले होते. २०१८ च्या फायनलमध्ये चेन्नईने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला होता. 

2019

मुंबईने चेन्नईचा पराभव करत चौथ्या चषकावर नाव कोरले. मुंबईने फायनलमध्ये तिसऱ्यांदा चेन्नईचा पारभव केला. रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर मलिंगाने शार्दूल ठाकूर याला क्लिनबोल्ड करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले. 

2020

मुंबईने पिहिल्यंदाच धोनीशिवाय फायनल जिंकली. मुंबईने पहिल्या चारही चषकावर धोनीच्या संघाचा पारभव करत नाव कोरले होते. २०२० मध्ये पहिल्यांदाच मुंबईने दुसऱ्या संघाचा पराभव करत चषक जिंकला. दिल्लीचा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा चषकावर नाव कोरले.

2021

धोनीने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. फायनलध्ये कोलकात्याचा 27 धावांनी पराभव करत धोनीने जेतेपद जिंकले. 

2022

गुजरात आणि लखनौ या दोन संघाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. या दोन्ही संघाने पहिल्या झटक्यात प्लेऑफ गाठली. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने चषकावर नाव कोरले.  गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव करत चषकावर नाव कोरले. 

2023

चेन्नई आणि गुजरात संघामध्ये २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. चेन्नई पाचव्यांदा जेतेपद पटकावणार की गुजरात सलग दुसऱ्यांदा चषक उंचावणार.. याकडे क्रीडा प्रेमीचे लक्ष लागलेय.

आणखी वाचा : 

IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर

आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी

GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास

IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 

पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर

WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ

[ad_2]

Related posts