Maharashtra News Dhananjay Munde Decision Marathwada Cabinet Meeting Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धाराशिव: मराठवाड्यातील (Marathwada Cabinet Meeting) मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूर आणि नांदेडकरांना हिसका दिला आहे. या विषयावर लातूर आणि नांदेडचे लोक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना बीड जिल्ह्यातल्या थेट परळीला आणि अंबाजोगाईला नेल्या. खरं म्हणजे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये विकासाची गरज असताना याच विभागातल्या जिल्ह्यांनी एकमेकांवरती कुरघोडी करणं हे कितपत योग्य असा प्रश्न विचारला जातोय. 

धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असले तरी त्यांच्यासाठी विकास म्हणजे सबकुछ परळी आहे. छत्रपती संभाजी नगरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची पडताळणी केली तर असेच वाटत आहे.

  • परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय 
  • परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
  •  परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

लातूर जिल्ह्यातील देवणचे देवणी वंश संशोधन केंद्र परळीला कृषी विभागासाठी सबकुछ धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ परळी आहे असे दिसते आहे. 

लातूरचे लातूर जिल्ह्यातील देवणी येथीली देवणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या कंधारची कंधारी हा गोवंश ही त्या भागाची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा गोवंशा मध्ये या जातींचा समावेश होतो. खिलारी…अत्यंत देखणी अशी देवणी आणि लाल कंधारी जातीची बैल जोडी असते. गोवंश जातींवर संशोधन व्हायचं असेल तर जिथे त्याची उपज, उत्पादन आणि विक्री होते तिथेच ते व्हायला हवं. पण देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून धनंजय मुंडेंनी लातूर आणि नांदेडकरांना जबर हिसका दिला आहे.

मंत्री झाल्यानंतर बहुसंख्य काम आपल्या मतदारसंघात करणे आजकालचा ट्रेंड

एखाद्या विभागाचा मंत्री झाल्यानंतर त्या विभागातील बहुसंख्य काम आपल्या मतदारसंघात करणं ही अलीकडच्या राजकारणात रुजू झालेली आणि स्थिरावलेली पद्धत आहे.  महाराष्ट्रातल्या विकासाचे मॉड्युल म्हणून ज्या बारामतीकडे पाहिलं जातं तिथंही हीच स्थिती आहे किंवा अगदी दक्षिणेत ते राज्यातल्या रेल्वेमंत्र्यांनी किंवा ममता बॅनर्जी यांनी किंवा नितीश कुमार यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये रेल्वेची काम केली.  परंतु धनंजय मुंडे ज्या मराठवाडा विभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या विभागातल्या सर्वच जिल्ह्यांना विकासाची गरज आहे.  अशा वेळी त्या  मतदारसंघातील वैशिष्ट्य तिथेच ठेवून आपल्या मतदारसंघांमध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या असत्या तर त्याला कोणाचीच हरकत नव्हती. 

सोयाबीन उत्पादनात लातूर अग्रेसर

जी गोष्ट गोवंशाची तीच सोयाबीनच्या पिकाची आहे. संपूर्ण देशात सोयाबीन उत्पादनात लातूर अग्रेसर आहे. लातूरहून सोयाबीन तेलाचे भाव ठरतात. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत लातूरच्या कृषी महाविद्यालयात सोयाबीन परिषद झाली होती. तेव्हा सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे अशी मागणी पुढे आली. माजी कृषी मंत्री सत्तार यांनीही लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते. धनंजय मुंडे कृषी मंत्री होताच त्यांनी हे केंद्र परळीला हलवले.

धनंजय मुंडे यांनी याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना बीड जिल्ह्यातल्या थेट परळीला आणि अंबाजोगाईला नेल्या. खरं म्हणजे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये विकासाची गरज असताना याच विभागातल्या जिल्ह्यांनी एकमेकांवर कुरघोडी करणं हे कितपत योग्य असा प्रश्न विचारला जात आहे. 

हे ही वाचा :

ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकरांचीही चौकशी

 

[ad_2]

Related posts