Ganesh Chaturthi 2023 Ganesh Immersion For One And Half Day Ganpati In Across Maharashtra BMC Prepare For Immerssion

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  मंगळवारी घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे आज विसर्जन होणार आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने (BMC) गणेश विसर्जनाची (Ganesh Immersion) तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गीक विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. राज्यातही विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तर, दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील आहेत. त्याशिवाय, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. 

स्टिंग रे, जेलीफिश पासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या समुद्र किनारी स्टिंग रे, जेलीफिशच आढळून येतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्र किनारी येणाऱ्या गणेश भक्तांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. 

गणेश विसर्जनाचा मुहूर्त काय?

 गणेश विसर्जन (दीड दिवस) मुहूर्त – 20 सप्टेंबर – दुपारी 3.18 ते संध्याकाळी 6.18
7.49 रात्री – 12.15 मध्यरात्री, 21 सप्टेंबर
3.12 पहाटे – 4.40 पहाटे, 21 सप्टेंबर 



[ad_2]

Related posts