Supriya Sule Criticize Ajit Pawar Without Taking Name In Special Parliament Session

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit Pawar) सणसणीत टोला लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत एक वक्तव्य केलं त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे चांगल्याच बरसल्या.  बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

त्याचं झालं असं की, लोकसभेत बुधवारी (20 सप्टेंबर) अमित शाह यांनी महिला आरक्षणावर बोलत असताना एक वक्तव्य केलं. यावेळी अमित शाह म्हणाले की, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतात, कारण भावांनाही बहिणीची काळजी असते. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना  टोला लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येक घरात असतोच असं नाही. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं की त्यांना चांगलं चिंतणारा भाऊ मिळेल”

सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवरही निशाणा

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपच्या नेत्यांनाही खडसावलं. भाजपचे एकेकाळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यानं मला ऑन कॅमेऱ्यावर घरी जाऊन जेवण बनवण्यास सांगितलं होतं. ही भाजपची प्रवृत्ती आहे. “सुप्रिया सुळे, घरी जा, जेवण बनवा, देशी कोणी दुसरा चालवू शकतो”, असं म्हटलं गेल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगत चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याची आठवण करुन दिली आणि चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

भाजपला चांगलंच खडसावलं

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या दुसऱ्या एका मंत्र्यानं देखील माझ्याबद्दल ऑन कॅमेरा अपशब्द वापरले, त्यामुळे या सर्व घटनांवर भाजपनं उत्तर दिलंच पाहिजे. तुमचे मंत्री लोकांमधून निवडून आलेल्या महिलेबद्दल वैयक्तिक टिप्पणी करतात. मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती, ती द्यायची गरज देखील मला वाटली नव्हती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आणि महिला आरक्षणावर बोलणाऱ्या भाजपला चांगलंच खडसावलं. यावेळी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचंही जाहीर केलं. 

हेही वाचा:

Hingoli : भाजप आमदाराची हिंगोलीतील नरसी नामदेव विश्वस्ताला बेदम मारहाण, हिशोब विचारल्यानंतर राग अनावर झाल्याने कृत्य

[ad_2]

Related posts