BKC ते आरे हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सेवेत येण्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC)ला कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीच्या संचालनासाठी नऊ मेट्रो ट्रेनची आवश्यकता आहे. आंध्र प्रदेशातील श्री शहरातून आतापर्यंत आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

आता फक्त एकाच गाडीटी प्रतीक्षा असून ही गाडीही येत्या काही दिवसांत आरे कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

एमएमआरसीच्या माध्यमातून मेट्रो ३ चे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग 33.5 किमीचा असून तो दोन टप्प्यांत वाहतूक सेवेत आणला जाणार आहे. त्यानुसार, एमएमआरसी बीकेसी ते आरे हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये आणि बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये सुरू करण्याची योजना आखत आहे.

या पार्श्वभूमीवर, एमएमआरसीने पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला गती दिली आहे. दुसरीकडे मेट्रो ट्रेन मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग आला आहे. ३३.५ किमी लांबीच्या या मार्गासाठी ३१ गाड्यांची आवश्यकता आहे. या गाड्या आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून बांधल्या जात आहेत.

दरम्यान, आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी एमएमआरसीला नऊ मेट्रो गाड्यांची गरज आहे. त्यानुसार आतापर्यंत आठ देशांतर्गत बनवलेल्या, स्वयंचलित गाड्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती एमएमआरसीने दिली.

पहिली ट्रेन ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईत दाखल झाली आणि सप्टेंबर 2023 मध्ये आठवी ट्रेन मुंबईत आली. त्याचबरोबर या नव्या मेट्रो ट्रेन्स तसेच भुयारी मार्गात प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा येत्या तीन ते चार महिन्यांत संपण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

विरार-डहाणू लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवण्यास रेल्वेचा नकार

मुंबई मेट्रो लाईन 2B चीता कॅम्प पर्यंत विस्तारित करण्यात येणार

[ad_2]

Related posts