Dhangar Reservation Ahmednagar Maharashtra People Are Opposite To Government Decision Protest Will Going On Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : राज्यात मराठा आंदोलनाचा (Maratha Protest) मुद्दा आता कुठे जरासा शांत झाला तोच धनगर आंदोलनाचा (Dhangar Protest) मुद्दा पेटला आहे. यशवंत सेनेच्या आंदोलनानंतर धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून बैठक बोलावण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय हे यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळे हे उपोषण सुरुच राहणार असल्याची भूमिका चौंडीमधील आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तर या आंदोलनकर्त्यांकडून सरकारच्या निर्णयाची देखील होळी करण्यात आली. 

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीमध्ये सरकारमधील मंत्री आणि काही आमदारांनी देखील हजेरी लावली होती. तर यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाला यशवंत सेनेच्या आंदोलकांनी विरोध केला. 6 सप्टेंबरपासून अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू केले. अगदी पहिल्या दिवसापासून अनेक राजकिय नेत्यांना या उपोषण स्थळी भेट दिली. जनजातीय कार्य मंत्रालयाचा वार्षिक अहवालात धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात आहे, त्याची अंमलबजावणी करावी, अशा मागणी सध्या धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. सुरुवातील या आंदोलनाला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. पण जसेजसे दिवस पुढे जाऊ लागले हे आंदोलन अधिक तीव्र होत गेल्याचं पाहायला मिळालं. 

सरकारचा निर्णय काय?

यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. तर या शिष्टमंडळाचा अहवाल देशाचे ॲटर्नी जनरल यांच्याकडे पाठवून राज्य शासनाच्या पातळीवर त्याप्रमाणे निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. तर आंदोलनादरम्यान धनगर समाजबांधवांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान सरकारची ही भूमिका धनगर समाजाला मान्य नसून तात्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. उपोषणाच्या 16 व्या दिवशी चौंडीतील उपोषकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृती बिघडली आणि त्या श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला, त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यांनी नकार दिला सोबतच बैठक निष्फळ ठरल्याने यापुढे वैद्यकीय उपचार देखील घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

हेही वाचा : 

‘पत्नीचे कुंकू पुसून आलोय, माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा’; सुरेश बंडगरांचा उपचार घेण्यास नकार

[ad_2]

Related posts