Asian Games 2023 Asian Games Silver Medal In Rowing And Shooting

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस खूप छान होता. भारताने 2 पदके जिंकली आहेत. महिला क्रिकेटमध्येही पदक पटकावले आहे. स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला.

भारताला दोन रौप्यपदके मिळाली

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला दोन रौप्यपदके मिळाली आहेत. भारताला पहिले पदक रोइंगमध्ये मिळाले, अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइट वेट डबल्समध्ये रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत 6:28:18 गुणांसह भारतासाठी रौप्यपदक जिंकण्यात ते यशस्वी ठरलो. याशिवाय 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताचे दुसरे पदक महिला संघाने पटकावले. मेघुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी भारतासाठी दिवसाचे दुसरे पदक जिंकले. भारताला पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत लाइट वेट दुहेरी रोईंगमध्ये पदक मिळाले आहे. याआधी या स्पर्धेत एकाही भारतीयाला पदक मिळाले नव्हते. मात्र, 2010 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगलाल ठक्करने सुवर्णपदक जिंकून चमत्कार केला. याशिवाय 2006 दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले होते. 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात स्वरण सिंग यशस्वी ठरला होता.

 

 

 

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Asian Games 2023 : भारतीय महिलांची दमदार कामगिरी, पदक केले निश्चित, बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश



[ad_2]

Related posts