Jayakwadi Dam Water Level Inflow Of Water In Jayakwadi Dam Increased

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे, काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. सोबतच धरणांमध्ये देखील पाण्याची वाढ होतांना पाहायला मिळत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) देखील पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर ,जायकवाडीत 36.35 टक्के पाणीसाठा आहे. 

नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून, धरणातून 3 हजार 408 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात जात आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणाची आकडेवारी…

जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1507.78 फूट असून, मीटरमध्ये 459.571 मीटर पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा 1527.291 दलघमी असून,  जिवंत पाणीसाठा 789.185  दलघमी पाणीसाठा आहे. धरणाची पाणीसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास 36.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच 1 जूनपासून जायकवाडी धरणात 424.69 दलघमी म्हणजेच 15.00 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध जलसाठा

गंगापूर – 97 टक्के

कश्यपी – 89 टक्के

पालखेड – 97 टक्के

दारणा – 88 टक्के

भावली – 100 टक्के

मुकणे – 89 टक्के

वाकी- 82  टक्के

भाम- 100 टक्के

वैजापूर तालुक्यातील 17 गावांना सतर्कतेचा इशारा…

नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशात गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या 17 गावातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rain Update : नाशिकच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग, संभाजीनगरच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा; काय आहेत प्रशासनाच्या सूचना?

[ad_2]

Related posts