The conjunction of Rahu and Jupiter is going to end the golden time of these zodiac signs will begin

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru Rahu Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह ज्यावेळी त्यांची रास बदलतात तेव्हा शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ग्रहांमुळे तयार झालेले हे योग काही वेळाने संपतात. 

येत्या 30 ऑक्टोबरला राहू ग्रह आपली राशी बदलणार आहे. दरम्यान राहूच्या या गोचरमुळे राहू आणि गुरूचा अशुभ संयोग संपुष्टात येणार आहे. या संयोगाच्या समाप्तीमुळे, काही राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या अशा राशी आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac)

बृहस्पति आणि राहूच्या संयोगाच्या समाप्तीमुळे सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. गुरू ग्रह तुमच्या राशीतून नवव्या स्थानात प्रवेश करणार आहे. याशिवाय गुरु बृहस्पति देखील भाग्य स्थानाचा कारक आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्नही वाढणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी लाभदायक प्रवास करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात. 

मेष रास (Aries Zodiac)

बृहस्पति आणि राहूच्या युतीच्या समाप्तीमुळे चांगले लाभ होऊ शकतात. मेष राशीमध्ये राहू आणि गुरूचा संयोग आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अविवाहित लोकांचे लग्न होऊ शकते. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणार आहे. 

धनु रास (Dhanu Zodiac)

राहू आणि गुरूच्या युतीचा शेवट तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही योजनेत यश मिळू शकते. शेअर बाजारात तुम्हाला फायदा होणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. कोर्ट- कोर्ट केसेसमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. प्रेमप्रकरणात अधिक गोडवा राहील.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts